अभिषेक शर्माच्या रडारवर विराट कोहलीचा 9 वर्षे जुना विक्रम, इतकं केलं की झालं..

भारताने टी20 मालिकेत विजयी सलामी दिली आहे. पण विजयात अभिषेक शर्माचा वाटा काही खास राहिला नाही. फक्त 17 धावा करून तंबूत परतला. आता दुसर्‍या टी20 सामन्याच्या त्याच्या खेळीकडे लक्ष असेल.

| Updated on: Dec 10, 2025 | 9:26 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची लिटमस टेस्ट होत आहे. दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका त्याचा भाग असणार आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धची मालिका सुरु असून पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. भारताने 101 धावांनी दक्षिण अफ्रिकेला पराभूत केलं. (Photo- Instagram)

2 / 5
भारताचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माच्या अपयशानंतरही हा विजय मिळाला. त्याला फक्त 17 धावा करता आल्या. मात्र दुसऱ्या सामन्यात मैदानात उतरेल तेव्हा तो एक उत्कृष्ट खेळी खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. इतकंच काय तर विराट कोहलीने रचलेल्या एका मोठ्या विक्रमाकडेही लक्ष असेल. (Photo- PTI)

3 / 5
अभिषेक शर्मा दुसऱ्या टी20 मध्ये टीम इंडियाचा ट्रम्प कार्ड ठरू शकतो. कारण 11 डिसेंबर रोजी होणारा हा सामना चंदीगडच्या मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे आणि अभिषेकचे होम ग्राउंड आहे. दुसरे म्हणजे, या मैदानावर धावा काढणे कटकमध्ये जितके कठीण नाही.  (Photo- PTI)

4 / 5
अभिषेक शर्मा गेल्या वर्षापासून क्रिकेट जगतात धुमाकूळ घालत आहे. या वर्षीही आक्रमक खेळी करत विक्रम मोडत आहे. सर्वात कमी चेंडूत 1000 टी20 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम आधीच प्रस्थापित केला आहे. आता अभिषेकच्या रडारवर विराट कोहलीचा विक्रम आहे.  (Photo- PTI)

5 / 5
2016 मध्ये विराट कोहलीने 29 टी20 डावांमध्ये 1614 धावा केल्या. एका वर्षात टी20 क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्याचा हा विक्रम आहे. अभिषेक शर्माने या वर्षी आतापर्यंत 37 डावात 1516 धावा केल्या आहेत. पुढच्या चार सामन्यांमध्ये 99 धावा केल्या तर तो विराटचा विक्रम मोडेल.  (Photo- PTI)