
टीम इंडियाचा स्टार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली याने टी 20i नंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. विराट आता फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. विराट सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. तर अभिनेत्री अनुष्का शर्मा ही विराटची पत्नी आहे. दोघांना सुरक्षेसाठी पर्सनल बॉडीगार्ड सोबत ठेवावा लागतो. विराट आणि अनुष्काकडून या बॉर्डीगार्डला किती पगार मिळतो? जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

प्रकाश सिंह असं विराट-अनुष्काच्या बॉडीगार्डचं नाव आहे. प्रकाश सोनू या नावानेही ओळखला जातो. सोनू गेल्या काही वर्षांपासून अनुष्कासोबत आहे. तसेच सोनूवर विराटच्या सुरक्षेचीही जबाबदारी आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

विराट आणि अनुष्का हे दोघेही त्यांच्या मुलांबाबत सजग आहेत. विराट आणि अनुष्काने वामिका आणि अकायचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेला नाही. तसेच ते माध्यमांनाही आपल्या मुलांचा फोटो काढून देत नाहीत. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

अकाय आणि वामिका या दोघांचा फोटो कुणी चोरून काढू नये, याची संपूर्ण काळजी सोनू घेतो. सोनू अनुष्कासोबत 2017 पासून आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

विराट, अनुष्का, वामिका आणि अकाय यांच्या सुरक्षेसाठी सोनूला तगडा पगार मिळतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनूला वार्षिक 1.2 कोटी पगार आहे. हा पगार भारतातील कित्येक सीईओपेक्षा जास्त आहे. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)