
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने संपले असून 1-1 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक असणार आहे. पण हा सामना रनमशिन विराट कोहलीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. (Photo- BCCI X)

विराट कोहली सध्या फॉर्मात असल्याचं दिसून आलं आहे. पहिल्या दोन वनडे सामन्यात त्याने शतक ठोकून आपली क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे त्याच्याकडून तिसऱ्या वनडेतही अपेक्षा वाढल्या आहेत. या सामन्यात शतक ठोकलं तर त्याच्या नावावर एका विक्रमाची नोंद होईल. (Photo- BCCI X)

विराट कोहलीन पहिल्या वनडे सामन्यात 11 चौकार आणि 7 षटकार मारत 135 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या वनडे सामन्यात 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 102 धावा केल्या होत्या. (Photo- BCCI X)

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 6 डिसेंबरला तिसरा वनडे सामना विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहली शतकांची हॅटट्रीक करू शकतो. यापूर्वी विराट कोहलीने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्द तीन शतक ठोकले होते. (Photo- BCCI X)

सात वर्षानंतर विराट कोहलीकडे इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात दोन वेळा 3-3 शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरेल. आता तिसऱ्या वनडे सामन्यात अशी कामगिरी करतो का? याकडे लक्ष लागून आहे. (Photo- BCCI X)