
केएल राहुल आणि विराट कोहली या जोडीने पाकिस्तान विरुद्ध 233 धावांची नाबाद विक्रमी भागीदारी केली. टीम इंडियाने या भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानसमोर 357 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे.

विराटने 94 बॉलमध्ये 9 चौकार आणि 3 कडक सिक्सच्या मदतीने 122 धावांची नाबाद शतकी खेळी केली. विराटने या शतकासह मोठा रेकॉर्ड केला आहे.

विराट कोहली हा कोलंबोचा किंग ठरला आहे. विराटचं कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममधील हे चौथं वनडे शतक ठरलं आहे.

विराट कोहली याने आर प्रेमदासा स्टेडियममध्ये 2012 साली पहिलं शतक ठोकलं. विराटने तेव्हा श्रीलंका टीम विरुद्ध 2012 साली जुलै महिन्यात 119 बॉलमध्ये नॉट आऊट 128 रन्स केल्या होत्या.

विराटने त्यानंतर 2017 या वर्षात 2 शतकं ठोकली. कोहलीने सप्टेंबर 2017 मध्ये 116 चेंडूत नाबाद 110 धावांची खणखणीत खेळी केली.

तर त्याआधी 2017 या वर्षातील ऑगस्ट महिन्यात विराटने फक्त 96 बॉलमध्ये 131 धावा कुटल्या होत्या.