
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत टीम इंडियाने सलग पाच सामने जिंकत उपांत्य फेरीवर धावा ठोकला आहे. न्यूझीलंडला 4 गडी आणि 12 चेंडू राखून पराभूत केलं. या सामन्यात विराट कोहलीने मोलाची कामगिरी बजावली. त्यामुळे टीम इंडियाचा विजय सोपा झाला.

भारताला विजय मिळवून देणारा विराट कोहली या सामन्यात 95 धावा करून बाद झाला. या सामन्यात शतकी खेळी करणं सोपं होतं. पण षटकार मारण्याच्या नादात लाँग ऑनला झेल बाद झाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधघ्ये विराट कोहली आठव्यांदा 90-100 च्या दरम्यान बाद झाला आहे. कोहली बांगलादेश विरुद्ध 1, वेस्ट इंडिज विरुद्ध 2, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1, ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 आणि न्यूझीलंड विरुद्ध 1 वेळा बाद झाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्य विराट कोहली पाच वर्षानंतर नर्व्हस नाइनटीजचा बळी ठरला आहे. तसेच न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदाच असं घडलं आहे. जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 वेळा 90-100 दरम्यान बाद झाला नसता तर शतकांची संख्या 78 ऐवजी 86 असती.

विराट कोहली याने मर्यादीत षटकांच्या स्पर्धेत 3000 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच एकाच सीझनमध्ये धावांचा पाठलाग करताना चारवेळा अर्धशतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

91 धावा विरुद्ध बांग्लादेश (2010), 94 धावा विरुद्ध वेस्टइंडीज (2011, 99 धावा विरुद्ध वेस्टइंडीज (2013), 96 धावा विरुद्ध दक्षिण अफ्रीका (2013),91 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2016), 92 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2017, 97 धावा विरुद्ध इंग्लंड (2018), 95 धावा विरुद्ध न्यूझीलंड (2023).

विराट कोहली वनडे क्रिकेट फॉर्मेटमध्ये सहाव्यांदा नर्वस नाइनटीजवर बाद झाला आहे. वनडेमध्ये सचिन तेंडुलकर सर्वाधिक वेळा नर्वस नाइनटीजचा बळी ठरला आहे. 17 वेळा त्याचं शतक हुकलं आहे. तर सौरव गांगुली 6, शिखर धवन 6, वीरेंद्र सेहवाग 5 वेळा नर्वस नाइनटीजचे बळी ठरले आहेत.