कन्फर्म! आपयीएल 2026 स्पर्धेत विराट कोहली त्रिशतक ठोकणार, पहिल्या चार सामन्यात इतिहास रचण्याची संधी

आयपीएल स्पर्धेच्या 18व्या पर्वात विराट कोहली आणि आरसीबी संघाचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं. आता पुन्हा एकदा नव्या पर्वासाठी सज्ज झाले आहे. असं असताना विराट कोहली या स्पर्धेत एक खास त्रिशतक ठोकण्याच्या वेशीवर आहे.

| Updated on: Mar 13, 2026 | 5:04 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धा 28 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत गतविजेत्या आरसीबीचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहलीच्या फलंदाजीची मजा क्रीडाप्रेमींना घेता येणार आहे. कारण विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून टी20 आणि कसोटीला रामराम ठोकला आहे. (Photo- PTI)

2 / 5
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला असला तरी आयपीएल स्पर्धेत हा फॉर्मेट खेळणार आहे. दोन महिने विराट कोहली मैदानात घाम गाळताना दिसणार आहे. असं असताना आयपीएलच्या या पर्वात एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे. यासाठी त्याला  9 मोठ्या आणि उत्तुंग फटक्यांची गरज आहे. (Photo- PTI)

3 / 5
विराट कोहलीला षटकारांचं त्रिशतक पूर्ण करण्यासाठी 9 षटकारांची गरज आहे. विराट कोहलीने 259 डावात 291 षटकार मारले आहे. यापूर्वी आयपीएल स्पर्धेत षटकारांचं त्रिशतक ठोकण्याची कामगिरी भारताकडून रोहित शर्माने केली आहे. त्याने 302 षटकार मारले आहेत. तर सर्वाधिक षटकार मारण्याच विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 357 षटकार मारलेत. (Photo- PTI)

4 / 5
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून टी20 क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर वेगळ्या शैलीत फलंदाजी करत आहे. क्रिझवर आल्या आल्या त्याने षटकार मारले. विराट कोहलीने मागच्या पाच डावात 2 शतकं ठोकली आहेत. तसेच एक अर्धशतकही नावावर आहे. (Photo- PTI)

5 / 5
विराट कोहलीने आयपीएल 2025 मध्ये 54 च्या सरासरीने 657 धावा केल्या आहेत. यात 8 अर्धशतकांचा समावेश आहे. यावेळी त्याने 19 षटकार आणि 66 चौकार मारले होते. (Photo- PTI)

Follow Us