
भारतीय क्रिकेट संघात फक्त 11 खेळाडू नाहीत. त्यांची देखभाल करण्यासाठी तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी मोठा सपोर्टिंग स्टाफ आहे. भारतीय खेळाडूंची काळजी घेण्याचे काम या सपोर्टिंग स्टाफकडे आहे.

याच सपोर्टिंग स्टाफमध्ये एक महिला सदस्यसदेखील आहे. ही महिला सदस्य टीम इंडियासोबत सावलीप्रमाणे असते. या महिलेचे नाव रजल अरोरा असे आहे. रजल अरोरा भारतीय क्रिकेट संघाची सोशल मीडिया मॅनेजर आहे.

रजल अरोरा भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये तसेच इतरही अनेक ठिकाणी नेहमीच दिसते. मैदानावरही ती अनेकदा झळकलेली आहे. भारतीय संघ परदेश दौऱ्यावर असताना त्या प्रसंगीदेखील रजल अरोरा उपस्थित असतेच.

रजल अरोरा 2015 सालापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयसोबत काम करत आहे. रजल अरोरा ही आयपीएलची डिजिटल तसेच मीडिया मॅनेजर म्हणूनही काम पाहते.

रजल अरोराला पत्रकारितेचीही मोठा अनुभव आहे. तिचे खरे नाव राजलक्ष्मी अरोरा असे आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात कन्टेंट रायटर म्हणून केली होती. ती विराट कोहली, रोहित शर्मा यासारख्या स्टार क्रिकेटर्सना नेहमी भेटते.