ODI World Cup 2027: अभिषेक शर्माची वनडे संघातील वाट बिकट? तीन खेळाडूंची थेट लढत
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला तसं पाहिलं तर दीड वर्षांचा अवधी शिल्लक आहे. पण आतापासून संघाची बांधणी करण्यावर जोर दिला जात आहे. यासाठी 20 खेळाडूंची निवड केली आहे. पण त्यापैकी फक्त 15 खेळाडूंना स्थान मिळेल. असं असताना अभिषेक शर्माच्या वाटेत तीन खेळाडूंचा अडसर आहे.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे खेळली जाईल. या स्पर्धेसाठी टीम इंडियाने शुबमन गिलच्या नेतृत्वात संघाची बांधणी करण्यास सुरूवात केली आहे. यासाठी 20 खेळाडूंची नाव निश्चित केली आहेत. यात अभिषेक शर्माचं देखील नाव आहे. (Photo- BCCI)

अभिषेक शर्माला वनडे संघात स्थान मिळेल की नाही येथपासून सुरूवात आहे. कारण सलामीच्या जागेसाठी तीन नावांमध्ये चुरस आहे. तसं पाहिलं दोन नावं तर ठरली आहेत. रोहित शर्मा आणि कर्णधार शुबमन गिल सुरुवात करतील. पण या जोडीपैकी एखादा दुखापतग्रस्त झाला किंवा फॉर्म गमावला. तर त्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड होईल. (Photo- BCCI)

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या राखीव सलामीवीराच्या जागेसाठी तीन खेळाडू शर्यतीत आहेत. यात यशस्वी जयस्वाल, इशान किशन आणि अभिषेक शर्मा ही नावं आहेत. त्यामुळे अभिषेक शर्मासाठी सलामीची जागा मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण यशस्वी जयस्वाल आणि इशान किशनही तितक्याच ताकदीचे फलंदाज आहेत. (Photo- BCCI)

वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी तिसऱ्या सलामीचा राखीव खेळाडू म्हणून यशस्वी जयस्वाल आणि इशान किशन यांच्यात थेट लढत आहे. त्यातही इशान किशन भारी पडेल असं दिसत आहे. कारण त्याने 24 वनडे सामन्यात 42.4 च्या सरासरीने 933 धावा केल्या आहेत. तसेच 102.19 चा स्ट्राईक रेट आहे. यात 7 अर्धशतकं आणि एका द्विशतकाचा समावेश आहे. (Photo- BCCI)

शुबमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, इशान किशन, अभिषेक शर्मा, रवींद्र जडेजा, संजू सॅमसन. (Photo- BCCI)