
ऑस्ट्रेलिया वूमन्सने टीम इंडियाला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी 12 ऑक्टोरबरला पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाचा हा टीम इंडिया विरुद्धचा वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील 11 वा विजय ठरला. भारताने विजयासाठी दिलेलं 331 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 बॉलआधी पूर्ण केलं.(Photo Credit: PTI)

भारताची या सामन्यात अप्रतिम सुरुवात झाली. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं. त्यानंतर टीम इंडियाने केलेल्या धावसंख्येचा ऑस्ट्रेलियाने यशस्वी पाठलाग केला. टीम इंडियाच्या पराभवासाठी 36 चा आकडा कारणीभूत ठरला. त्यामुळे टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाला 8 वर्षानंतर वर्ल्ड कपमध्ये पराभूत संधी हुकली. (Photo Credit: PTI)

टीम इंडियाच्या बॅटिंगचा हा 36 चा आकडा आहे. टीम इंडियाला प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या जोडीने भारताला 155 धावांची भागीदारी करुन दिली. त्यानंतर हरलीन देओल, ऋचा घोष, आणि जेमीमा रॉड्रिग्ज या त्रिकुटाने वेगाने धावा करुन टीम इंडियाला 300 धावांच्या जवळ पोहचवलं. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर 42.5 ओव्हरमध्ये 4 आऊट 294 असा होता. त्यामुळे टीम इंडियाला सहज 350 पर्यंत पोहचण्याची संधी होती. (Photo Credit: PTI)

मात्र 350 धावा करणं सोडा भारताला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 42 बॉलमध्ये 36 रन्सच्या मोबदल्यात 6 झटके दिले आणि 330 वर गुंडाळलं. (Photo Credit: PTI)

ऑस्ट्रेलियाने 331 धावांचं आव्हान हे 7 बॉलआधी पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने यासह विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. तसेच कांगारुंनी पॉइंट्स टेबलमध्ये पुन्हा एकदा पहिल्या स्थानी झेप घेतली. (Photo Credit: PTI)