
वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. 19 नोव्हेंबरला अंतिम फेरीचा सामना असणार आहे. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 ऑक्टोबरला असणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी लढत 14 ऑक्टोबरला असणार आहे.

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे. भारतात वर्ल्डकप स्पर्धा असल्याने टीम इंडियाला जेतेपदाची संधी असणार आहे.

भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल, केएल राहुल या सारखे खेळाडू फॉर्मात आहे. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींना प्रचंड आशा आहेत. पण युवराज सिंग याच्या मते यांच्या व्यतिरिक्त तीन खेळाडू गेमचेंजर ठरतील.

युवराज सिंग याच्या मत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा गेमचेंजर खेळाडू ठरतील. एका कार्यक्रमात गौतम गंभीर याच्यासोबत चर्चा करताना युवराज सिंग याने याबाबत भाकीत केलं आहे.

टीम इंडियामध्ये शेवटच्या क्षणी एक बदल करण्यात आला आहे. जखमी अक्षर पटेल याच्या जागी आर अश्विन याला संधी मिळाली आहे. सराव सामन्यासाठी आर अश्विन गुवाहाटीला पोहोचला आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.