
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा शेवटचा टप्पा वेस्ट इंडिजमध्ये होत आहे. त्यामुळे होम ग्राउंडचा वेस्ट इंडिजला लाभ मिळेल असं वाटत होतं. मात्र तसं काही झालं नाही. सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडने 8 विकेट राखून पराभूत केलं.

वेस्ट इंडिज टीम टी20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. वेस्ट इंडिजने दोनवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण सुपर 8 फेरीतील पराभवानंतर एक नकोसा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर जोडला गेला आहे.

वेस्ट इंडिजसाठी मागची काही वर्षे निराशाजनक राहिली. टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये तर क्वॉलिफायही करू शकली नाही. असं असताना इंग्लंडने पराभूत करताच 100वा पराभव नोंदवला गेला आहे.

वेस्ट इंडिज टी20 क्रिकेटमध्ये 100 पराभव पचवणारा तिसरा संघ ठरला आहे. यापूर्वी हा नकोसा विक्रम बांग्लादेश आणि श्रीलंकेच्या नावावर आहे. या तिन्ही संघांमध्ये एखादं सामन्याचा फरक आहे.

बांगलादेशने 101, श्रीलंकेने 100, वेस्ट इंडिजने 100, झिम्बाब्वेन 95 आणि न्यूझीलंडने 92 टी20 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. वेस्ट इंडिजने आणखी पराभवाचं तोंड पाहिलं तर या यादीत अव्वल स्थान गाठू शकते.