
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेची सुरुवात आरसीबीने विजयाने केली आहे. आरसीबीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभवाचं पाणी पाजलं. हा सामना आरसीबीने 3 विकेट राखून शेवटच्या चेंडूवर जिंकला. या सामन्यात आरसीबीची एक खेळाडू मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखी ठरली. तर हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदाला दुसऱ्यांना धक्का दिला आहे. (Photo: PTI)

हरमनप्रीतला डोकेदुखी ठरणारी ही खेळाडू दुसरी तिसरी कोणी नसून दक्षिण अफ्रिकेची नदीन डी क्लर्क आहे. तिने आपल्या अष्टपैलू खेळीने हरमनप्रीत कौरला धक्का दिला आहे. सुरुवातील गोलंदाजीत 26 धावा देत 4 विकेट काढल्या. यात हरमनप्रीत कौरलाही तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे मुंबईला फक्त 154 धावांपर्यंत मजल मारता आली. (Photo: PTI)

मुंबई इंडियन्सने दिलेल्या विजयी धावांचा पाठलाग करताना आरसीबीने 65 धावांवरच 5 विकेट गमावले होते. पण नादीन डी क्लर्कने मैदानात उतरली आणि सामन्याचं चित्र बदललं. शेवटच्या 4 चेंडूत आरसीबीला 18 धावांची गरज होती. पण डी क्लर्कने 6,4,6,4 मारत सामना जिंकवला. (Photo: PTI)

नादीन डी क्लर्कने या खेळीसह हरमनप्रीत कौरकडून विजयाचा घास हिरावून घेतला आहे. यापूर्वीही नादीन डी क्लर्कने हरमनप्रीत कौरला अशी जखम दिली आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धा पार पडली. या सामन्यातील साखळी फेरीत विजयाचा घास खेचून आणला होता. (Photo: PTI)

वुमन्स वर्ल्डकप सामन्यात नादीन डी क्लार्कने 2 विकेट घेतल्या होत्या. तेव्हा दक्षिण अफ्रिकेने 142 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. तेव्हा आठव्या क्रमांकावर फलंदाजी नादीन डी क्लरक्न 54 चेंडूत 84 धावा केल्या आणि दक्षिण अफ्रिकेला विजय मिळवून दिला. पण अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला लोळवलं आणि विजय मिळवला. (Photo: PTI)