WPL Auction: जगात वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती असलेल्या शबनिम इस्माईलवर लागली इतकी बोली

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेपूर्वी फ्रेंचायझी आवश्यक खेळाडूंवर बोली लावून संघ बांधणी करत आहेत. सर्वांच्या नजरा या वेगवान गोलंदाज शबनिम इस्माईलवर होती. कारण तिच्या सामना पालटण्याची ताकद आहे. त्यामुळे तिच्यासाठी किती बोली लागणार याची उत्सुकता होती.

Updated on: Nov 27, 2025 | 7:00 PM
1 / 5
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम इस्माईल मुंबई इंडियन्ससाठी खेळताना दिसणार आहे. शबनिम इस्माईल महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे तिचा सामना करताना फलंदाजांना डोकेदुखी ठरतं. (Photo- PTI)

2 / 5
शबनिम इस्माईलने 2024 वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. तिने 132.1 किमी ताशी वेगाने चेंडू टाकून इतिहास रचला होता. इस्माईलच्या वेगवान गोलंदाजीमुळे दक्षिण अफ्रिकेला अनेक सामन्यात सहज विजय मिळाला होता. आता मुंबई इंडियन्स विजय मिळवून देण्यास सज्ज झाली आहे. (Photo- PTI)

3 / 5
शबनिम इस्माईलसाठी खरं तर मोठी बोली लागायला हवी होती. पण मुंबई इंडियन्सने फक्त 60 लाखात तिला संघात घेतलं.  पॉवर प्ले आणि डेथ ओव्हरमध्ये ती सामना फिरवण्याची ताकद ठेवते. मात्र तिच्यासाठी इतर संघांनी काही रस दाखवला नाही. पण मुंबईने या संधीचं सोनं केलं असंच म्हणावं लागेल. (Photo- PTI)

4 / 5
शबनिम इस्माईलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. पण जगभरातील टी20 लीगमध्ये अजूनही खेळत आहे. वुमन्स बिग बॅश लीग, वुमन्स 100, WCPL आणि वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत खेळते.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ती 123 आणि वुमन्स प्रीमियर लीगमध्ये तिने 20 विकेट घेतल्या आहेत. (Photo- PTI)

5 / 5
शबनिम इस्माईल स्पीड पॉइंट टेक्निशियन म्हणून काम करत होती. पण तिचा जीव क्रिकेटमध्ये लागला होता. त्यासाठी काम करून ती क्रिकेटचा सराव करायची. त्या सरावाचं तिला फळंही मिळालं. तिने क्रिकेटमध्ये अनेक विक्रम रचले. (Photo- PTI)