
भारतीय महिला क्रिकेटला गेल्या काही वर्षात चांगले दिवस आले आहेत. त्यात वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेमुळे खेळाडूंचा भावही वधारला आहे. दुसरीकडे, स्मृती मंधानाच्या वैयक्तिक आयुष्यात उलथापालथ झाली आहे. लग्न पुढे ढकललं असताना सोशल मीडियावर अफवांचं पेव फुटलं आहे. स्मृती मंधानाची खास मैत्रीण आणि फिरकीपटू राधा यादवने पलाश मुच्छलला अनफॉलो केलं आहे. त्यामुळे नक्कीच काही तरी झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (PHOTO CREDIT- PTI)

वुमन्स प्रीमियरल लीग स्पर्धेतून राधा यादवसाठी एक आनंदाची बातमी आहे. वुमन्स प्रीमियर लीग 2026 मेगा लिलावात आरसीबीने राधा यादवसाठी चांगली बोली लावली. तिच्यासाठी 65 लाख रुपये मोजले आहेत. मागच्या तीन पर्वात राधा यादव दिल्ली कॅपिटल्सकडून खेळली होती. मात्र आता आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे. या संघाची कर्णधार स्मृती मंधाना आहे. (PHOTO CREDIT- PTI)

राधा यादवला दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केलं होतं. त्यामुळे 30 लाखांच्या बेस प्राईसवर लिलावात उतरली होती. गुजरात जायंट्सने तिच्यासाठी पहिल्यांदा बोली लावली. त्यानंतर गुजरात आणि आरसीबीत चढाओढ सुरु झाली. अखेर आरसीबीने 65 लाख मोजून तिला संघात घेतलं. राधा यादवमुळे आरसीबीला फिरकी गोलंदाज आणि खालच्या फळीत फलंदाजीसाठी एक खेळाडू मिळाला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

स्मृती मंधानाच्या कर्णधारपदाखाली आरसीबीने 2024 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता पुन्हा एकदा जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून संघ मैदानात उतरणार आहे. स्मृती आणि राधा एकाच संघात आल्याने ताकद वाढली आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दोघंही विजेत्या संघात होते. (PHOTO CREDIT- PTI)

राधा यादव वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत आतापर्यंत 20 सामने खेळली आहे. यात तिने 14 विकेट घेतल्या आहेत. तसेच 74 धावाही केल्या आहे. दुसरीकडे, टीम इंडियासाठी राधा यादव 14 वनडे आणि 89 टी20 सामने खेळली आहे. (PHOTO CREDIT- PTI)