
चीनमधील हांगझो येथ एशियन गेम्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारत विरुद्ध नेपाळ यांच्यात टी20 क्रिकेट सामना पार पडला. या सामन्यात यशस्वी जयस्वाल याची बॅट चांगलीच तळपली. शतकी खेळीसह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी सलामीला मैदानात उतरली आहे. यशस्वी जयस्वाल याने आक्रमक खेळी केली आणि 49 चेंडूत 7 उत्तुंग षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. यासह टी20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

शुबमन गिल याने वयाच्या 23 वर्षे आणि 146 दिवस असताना शतक ठोकलं होतं. हा विक्रम आता जयस्वालने मोडीत काढला आहे. त्याने टी20 क्रिकेटमध्ये 21 व्या वर्षी नेपाळ विरुद्ध शतक झळकावलं आहे.

एशियन गेम्समध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेट टी20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा आठवा भारतीय खेळाडू आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 4 गडी गमवून 202 धावा केल्या. नेपाळचा संघ 20 षटकात 9 गडी गमवून 179 धावा करू शकला. टीम इंडियाने नेपाळवर 23 धावांनी विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

भारतीय टीम : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिष्णोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह, आकाश दीप.