Sports Gossip | सुशीलकुमारची अटक ते कोहली-गांगुली वाद, 2021 मधील क्रीडा क्षेत्रातली चमचमीत गॉसिप्स

ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा पदक विजेती कामगिरी करणारा प्रसिद्ध कुस्तीपटू सुशील कुमारला हत्येच्या आरोपाखाली अटक झाली, तसं

| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 2:16 PM
1 / 9
वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघ परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभूत झाला. टी-20 च्या या सामन्यानंतर सोशल मीडियावर मोहम्मद शमीला लक्ष्य करण्यात आलं. त्याला त्याच्या धर्मावरुन लोकांनी लक्ष्य केलं. शमीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याला गद्दार ठरवणारे शेकडो मेसेजस पाठवण्यात आले. भारतीय संघाबाहेर तुला काढलं पाहिजे, अशी ट्रोलर्सची मागणी होती.

2 / 9
यंदाच्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने समस्त भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. भालाफेकीमध्ये नीरजने थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली. अॅथलेटीक्सच्या प्रकारात भारताला मिळालेले ऑलिम्पिकमधील हे पहिले पदक आहे.

3 / 9
भारताची अव्वल महिला टेबल टेनिसपटू मानिका बत्राने ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली. तिने तिसऱ्या फेरीपर्यंत आगेकूच केली होती. मानिकाने ऑलिम्पिकमध्ये चांगला खेळ केला. पण राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांच्यासोबतच्या वादामुळे तिच्या कामगिरीकडे दुर्लक्ष झाले. मानिका बत्राने राष्ट्रीय कोच रॉय यांच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप केले.

4 / 9
ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा पदक विजेती कामगिरी करणारा प्रसिद्ध कुस्तीपटू सुशील कुमारला हत्येच्या आरोपाखाली 23 मे ला दिल्ली पोलिसांनी अटक केली. सध्या तो तिहार तुरुंगात बंद आहे. पोलिसांनी मते, सुशीलकुमारचं मुख्य मास्टरमाइंड आहे. कुस्तीपटू सागर धानकरला हॉकि स्टिकने मारहाण केल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत. उपचारा दरम्यान धानकरचा मृत्यू झाला.

5 / 9
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत बेशिस्त वर्तनाचा ठपका ठेवत विनेश फोगटला रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने निलंबित केलं आहे. बेलारुसच्या महिला कुस्तीपटूने विनेश पराभूत केले.

6 / 9
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरने निराश केले. तिच्याकडून पदाकाची अपेक्षा होती. मनू भाकरचा नंतर कोच जसपाल रानासोबत झालेला शाब्दीक वाद चांगलाच गाजला.

7 / 9
वर्षाचा सुरुवातीला झालेला टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा चांगलाच गाजला. भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात धूळ चारली. भारतीय संघ एकाबाजूला दमदार कामगिरी करत असताना प्रेक्षकांनी स्टेडियममधून वर्णद्वेषी शेरेबाजी केली. SCG वर मोहम्मद सिराज आणि अजिंक्य रहाणेला प्रेक्षक गॅलरीतून वर्णद्वेषी शेरेबाजीला सामोरे जावे लागले.

8 / 9
वर्षअखेरीस भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी कसोटी कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी परस्परविरोधी विधाने केली. त्यामुळे नेमकं खरं कोण बोलतोय असा प्रश्न निर्माण झाला.

9 / 9
टी-20 चे कर्णधारपद सोडतान आपल्याला कोणी अडवलं नाही, उलट निवड समितीने निर्णय चांगल्या पद्धतीने स्वीकारला, असं विराटने सांगितलं. विराटने हा खुलासा करण्याआधी दादाने एका वृत्तवाहिनीशी बोलताना विराटला मी कर्णधारपद सोडू नको, असं सांगितलं होतं, अशी माहिती दिली. त्यामुळे दोघांमध्ये खर कोणं, खोटं कोण असा प्रश्न निर्माण झालाय.