
मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीच्या 'स्पृहानिया' या युट्यूब चॅनलनं 40 हजार सबस्क्रायबचा टप्पा पार केला आहे.

या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्पृहा चाहत्यांसाठी स्वत:च्या आणि नामवंत कविंच्या कविता सादर करत असते. सोबतच ती या चॅनलवरुन चाहत्यांशी संवादही साधत असते.

स्पृहानं तिच्या इन्स्टाग्रामवरुन याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. तिनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं आनंद व्यक्त करतानाच सोबतच चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच हा आकडा वाढत जावा आणि चाहत्यांचा असाच लोभ वाढत जावा अशी आशाही तिने व्यक्त केली आहे.

मराठमोळी स्पृहा जोशी उत्तम अभिनेत्री आणि सुत्रसंचालक तर आहेच मात्र सोबतच ती उत्तम कवयित्रीसुद्धा आहे.

तिच्या कवितांनी ती सगळ्यांना भूरळ पाडत असते. तिने सादर केलेल्या कवितांचे अनेक चाहते आहेत.