
मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या लंडनमध्ये धमाल करतेय.

'Dateभेट'या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सध्या सोनाली लंडनमध्ये आहे आणि आता अभिनेता संतोष जुवेकरसुद्धा चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचलाय.

आता चित्रीकरणातून वेळ काढत सोनाली आणि संतोषनं मस्त फोटोशूट केलं आहे.

लोकेश गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसह अभिनेता हेमंत ढोमे आणि अभिनेता संतोष जुवेकरसुद्धा महत्वाची भूमिका साकारणार आहे.

सध्या सोनाली चाहत्यांसाठी लंडनमधून भन्नाट फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.