
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात आदिवासी शेतकऱ्यांनी शेतीमध्ये क्रांती केली असून, आदिवासी शेतकरी स्ट्रॉबेरी उत्पादनाकडे वळाले आहेत. हे सातपुडा जवळपास १०० हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड केली जात असते.

नंदुरबारच्या सातपुड्याच्या दुर्गम भागात स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली जात आहे मात्र दर आणि योग्य बाजारपेठ अभावी आदिवासी भागातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

मात्र स्थानिक भागात स्ट्रॉबेरीला बाजारपेठ नसल्याने आणि बाजारपेठ असलेल्या ठिकाणी घेऊन येण्यासाठी खर्च अधिक असल्याने तसेच बाहेरील बाजारपेठेतही योग्य दर मिळत नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

सरकारने स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देत मोठ्या शहरांमध्ये आदिवासी भागातील नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या स्ट्रॉबेरीला योग्य दर देण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वाहतूक खर्च अधिक होत असल्याने दर परवडत नसल्याने स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. सातपुड्यातील तोरणमाळ, डाब, वालंबा परिसरात १०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड होत असते.

उत्पादन होऊन ही बाजारपेठ नसल्याने आदिवासी शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. स्ट्रॉबेरी दीर्घकाळ जतन करण्याची यंत्रणेचा अभाव, वाहतूक खर्च आणि इतर खर्च यामुळे स्ट्रॉबेरीचा लागवड खर्चही निघणार नसल्याने आदिवासी सध्या चिंतेत सापडले आहे. त्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.