हाडे होतील मजबूत, दूधातच नाही तर या 6 अन्नपदार्थातही आहे कॅल्शियम

Calcium Rich Indian Foods: भारतीयांत वाढत्या वया सोबतच हाडांची समस्या जास्त पाहायला मिळते. जी कॅल्शियमच्या कमतरतेने देखील होऊ शकते. कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी लोक केवळ दूध प्यायला सुरुवात करतात.परंतू भारतीय स्वयंपाक घरातील सहा अशा अन्नपदार्थात कॅल्शियम पूरेपूर आहे. ते पदार्थ कोणते ते पाहूयात...

| Updated on: Jul 30, 2026 | 11:25 PM
1 / 6
तीळ - तीळ कॅल्शियमचा सर्वात चांगला सोर्स मानला जातो. १०० ग्रॅम साल न काढलेल्या तिळात सुमारे ९७५ मिलीग्रॅम कॅल्शियम असते. जे दुधापेक्षा अनेक पटीने जास्त असते. यात मॅग्नेशियम देखील मोठ्या प्रमाणात आढळते. जे शरीरातील व्हिटामिन्स डीला एक्टीव्ह करणे आणि कॅल्शियमला चांगल्या प्रकारे शोषीत करण्यास मदत करते.

2 / 6
नाचणी - नाचणीला कॅल्शियमचा पॉवरहाऊस म्हटले जाते. कारण १०० ग्रॅम नाचणीत सुमारे ३४४ मिलीग्रॅम कॅल्शियम असते. जे हाडांना मजबूत बनवण्यासह मुलांना, महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना देखील फायदेशीर असते. नाचणीचा दलिया, रोटी वा डोसा बनवून खाता येते.

3 / 6
 राजगीरा - १०० ग्रॅम राजगीऱ्यात २१५ मिलीग्रॅम कॅल्शियम आढळते. हे ग्लुटेन-फ्री धान्य आहे. यात  फॉस्फोरस-लायसिन सारखे पोषक तत्वे असतात. जे हाडांची देखभाल आणि मजबूती करता मदत करते. उपवासात देखील याचा उपयोग केला जातो.

4 / 6
 शेवग्याची पाने (   मोरिंगा) - शेवग्याच्या प्रति १०० ग्रॅम ताज्या पानात  १८५ मिलीग्रॅम कॅल्शियम आढळते. याशिवाय यात व्हिटामिन्स सी भरपूर प्रमाणात असते. जे शरीराला शेवग्याच्या पानातून मिळणाऱ्या कॅल्शियमला चांगल्या प्रकारे वापर करण्यास मदत करते. याला भाजी, सुप वा पराठ्यात मिक्स करुन खाल्ले जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शेवग्याच्या पानांचे पराठे आवडीने खातात.

5 / 6
सूके अंजीर - जर तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील तर सुखलेले अंजीर देखील चांगला कॅल्शियमचा सोर्स आहे. १०० ग्रॅम सुखलेल्या अंजिरात सुमारे १६२ मिलीग्रॅम कॅल्शियम असते. यात फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जे हाडांना दीर्घकाळापर्यंत मजबूत राखण्यास मदत करते.

6 / 6
राजमा - राजमा केवळ टेस्टीच  नाही तर पोषणास देखील चांगला आहे. १०० ग्रॅम कच्च्या राजमात सुमारे १४३ मिलीग्रॅम कॅल्शियम असते, जे दूधापेक्षा कितीतरी जास्त आहे. यात प्रोटीन, मॅग्नेशियम आणि आयर्न देखील असते. राजमा चांगल्या प्रकारे भिजवून आणि शिजवून खाल्ल्याने शरीराला यातील पोषक तत्वे मिळतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us