
अभिनेता सनी देओल त्याच्या 'बॉर्डर 2' या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये सनी देओलने दमदार कमबॅक केलं आहे. 'गदर 2', 'जाट'नंतर आता 'बॉर्डर 2'मधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपट, जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंट यांमधून त्याने चांगली कमाई केली आहे.

काही रिपोर्ट्सनुसार, सनी देओलची एकूण संपत्ती सुमारे 130 कोटी रुपये आहे. शिवाय मुंबईतील विलेपार्ले आणि जुहूसारख्या परिसरात त्याची घरं आहेत. मलबार हिलमध्येही सनीचं आलिशान घर आहे. जिम, स्विमिंग पूल, खासगी थिएटर, हेलिपॅड यांसारख्या अनेक सुविधा त्याच्या घरात आहेत.

केवळ मुंबईतच नाही तर पंजाब आणि इंग्लंडमध्येही सनी देओलची काही मालमत्ता आहे. सध्या सनी जुहू इथल्या 'देओल हाऊस' या बंगल्यात राहत असून त्याचे मजले वाढवण्याचा विचार देओल कुटुंबीय करत आहेत. जवळपास 60 कोटी रुपयांच्या या बंगल्याचा एक मजला वाढविण्यात येणार आहे.

‘गदर 2’ आणि ‘जाट’ या चित्रपटांच्या यशानंतर सनी देओलच्या कमाईत आणखी वाढ झाली. सनी देओलची पत्नी पूजा देओलकडे 6 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिच्या नावावर कोणतंच घर किंवा जमीन नाही. पूजा देओलच्या संपत्तीत 1.5 कोटी रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे.

धर्मेंद्र यांनी जुहू इथल्या बंगल्यातच अखेरचा श्वास घेतला होता. त्यांची सुमारे 450 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूपत्राबाबत काही चर्चा सुरू आहेत. धर्मेंद्र यांच्या संपत्तीतून हेमा मालिनी यांच्या दोन्ही मुलींनाही वाटा मिळणार असल्याचं कळतंय.