
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी त्यांच्या 50 वर्षांच्या फिल्मी करिअरनंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर रजनीकांत यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रजनीकांत यांनी वयाच्या 74व्या वर्षापर्यंत फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. त्यांचा जवळपास प्रत्येक सिनेमा सुपरहिट ठरला होता. आता रजनीकांत यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

रजनीकांत यांनी फिल्म इंडस्ट्रीमधून ब्रेक घेऊन आध्यात्मिक यात्रेला जाण्याचा निर्णय घेतला आहे. या यात्रेचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रजनीकांत हे सध्या ऋषिकेशमध्ये आहेत. त्यांनी शनिवारी स्वामी दयानंद आश्रमाला भेट दिली आणि तेथे थोडा वेळ घालवला. दरम्यान त्यांनी स्वामी दयानंद यांना देखील श्रद्धांजली वाहिली.

एका फोटोमध्ये रजनीकांत हे गंगेच्या तीरावर ध्यान करताना दिसत आहे. तसेच त्यांनी गंगा आरतीमध्येही सहभाग घेतला आहे.

रजनीकांत यांनी पांढरे कापडे घालून या यात्रेला सुरुवात केली आहे. त्यांचा हा बदलेला लूक देखील सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.