
सर्वसामान्य कुटुंबातून आलेला, टिक-टॉक स्टार सूरज चव्हाण 'बिग बॉस 5'मध्ये दिसला होता. त्याने बिग बॉसचा ताज तर जिंकलाच पण तो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका ठरला. त्याचे लाखो चाहते आहेत. सूरजविषयी चाहत्यांच्या मनात आपुलकी पाहायला मिळते. सध्या सूरज त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

सूरज चव्हाण हा सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. तो सतत त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगताना दिसतो. सध्या सूरज त्याच्या एका फोटोमुळे चर्चेत आला आहे.

सूरजने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती मुलगी लाजताना दिसत आहे.

फोटोमध्ये सूजरने साऊथ इंडियन पेहराव केला आहे तर मुलीने हातात हिरव्या बांगड्या, केसात गजरा, कानात झुमके, साडी असा सुंदर लूक केला आहे.

सध्या सोशल मीडियावर सूरजचा हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. सूरजने हा फोटो शेअर करत केवळ हार्ट इमोजीचा वापर केला आहे. त्यामुळे अनेकांनी सूरजचं लग्न ठरलं असं म्हटलं आहे.

तसेच या फोटोवर एका यूजरने कलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आज तुम्ही सगळे काँग्रॅच्युलेशन करू शकता हे काय स्वप्न नाही बरं का अशी कमेंट केली आहे.

त्यामुळे सर्वत्र सूरज चव्हाणच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. तसेच फोटोमध्ये दिसणारी मुलगी आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.