भावी सूनबाई जान्हवी कपूरने जिंकलं सुशीलकुमार शिंदेंचं मन; पहिल्यांदाच..

अभिनेत्री जान्हवी कपूर पहिल्यांदाच शिखर पहाडियाच्या कुटुंबीयांसोबत दिसली. विशेष म्हणजे शिखरचे आजोबा आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हेसुद्धा तिच्या चित्रपटाच्या स्किनिंगला उपस्थित होते.

Updated on: Sep 23, 2025 | 3:17 PM
1 / 5
अभिनेत्री जान्हवी कपूरने अखेर बॉयफ्रेंड शिखर पहाडियाच्या कुटुंबीयांची मनं जिंकली आहेत, असं म्हणायला हरकत नाही. कारण तिच्या 'होमबाऊंड' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला शिखरच्या कुटुंबीयांची विशेष उपस्थिती पहायला मिळाली.

2 / 5
'होमबाऊंड' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला शिखरचे आजोबा आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. यावेळी रेड कार्पेटवर त्यांनी जान्हवीसोबत फोटोसाठी पोझसुद्धा दिले.

3 / 5
शिखरची आई आणि सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदेसुद्धा यावेळी उपस्थित  होत्या. शिखरच्या कुटुंबीयांसोबत जान्हवीने फोटो काढले. त्यानंतर संपूर्ण कार्यक्रमात ती त्यांची विशेष काळजी घेताना दिसली.

4 / 5
शिखरच्या कुटुंबीयांसोबत जान्हवीची जवळीक पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. हे दोघं लग्न कधी करणार, असा प्रश्न चाहते विचारत आहेत. जान्हवीला याआधीही शिखरच्या आईसोबत सिद्धिविनायक मंदिरात एकत्र गेल्याचं पहायला मिळालं होतं.

5 / 5
जान्हवी गेल्या काही वर्षांपासून शिखर पहाडियाला डेट करतेय. शिखर हा सुशिलकुमार शिंदेंचा नातू आहे. त्याची आई स्मृती शिंदे या अभिनेत्री आहेत. तर मोठा भाऊ वीर पहाडियाने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय.