
'मिस युनिव्हर्स'चा किताब पटकावलेली प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही दोन मुलींची आई आहे. सुष्मिताने अद्याप लग्न केलं नाही. परंतु बऱ्याच वर्षांपूर्वी तिने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. या दोघींच्या संगोपनात तिने कोणतीच गोष्ट कमी पडू दिली नाही.

रेने आणि अलिसाह.. अशी तिच्या दोन्ही मुलींची नावं आहेत. रेने आता 26 वर्षांची झाली असून सुष्मिताने सोशल मीडियावर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. आईप्रमाणेच रेनेसुद्धा अभिनेत्री असून सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते.

रेने दिसायला अत्यंत सुंदर असून तिच्यात थोडीशी दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची झलक पहायला मिळत असल्याच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. रेनेच्या दिसण्याची तुलना स्मिता पाटील यांच्याशी केली जात आहे.

इतकंच नव्हे तर काहींनी स्मिता पाटील यांचे जुने फोटो पोस्ट करत या दोघांची तुलना केली आहे. रेनेला पाहून एका सेकंदासाठी ती स्मिता पाटीलच वाटली, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

सुष्मिता सेनची मुलगी इतकी मोठी कधी झाली, कळलंच नाही, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत. रेनेच्या वाढदिवसानिमित्त सुष्मिताने खास पोस्ट लिहिली आहे. 'देवाकडून मिळालेली अमूल्य भेट, ज्यामुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं', अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.