
सुझुकी मोटारसायकल इंडियाने लोकप्रिय बाइक Hayabusa चं 2023 मॉडेल लाँच केलं आहे.या गाडीची किंमत सांगायची तर नवं मॉडेल महिंद्रा एक्सयुव्ही700 पेक्षा महाग आहे. 2023 सुझुकी हायाबुसाची एक्स शोरुम किंमत 16.90 लाख रुपये आहे. (Photo: Suzuki)

भारतात महिंद्रा एक्सयुव्ही 700 च्या बेस मॉडेल एमएस्कच्या एक्स-शोरूमची किंमत 14 लाख रुपये आहे. म्हणजेच नवी सुझुकी हायाबुसाची किंमत महिंद्रा एसयुव्हीपेक्षा महाग आहे. ही बाइक OBD-2 कॉम्प्लीयंट इंजिनसह सादर केली आहे. या गाडीचं बुकिंग सुरु झालं आहे. (Photo: Suzuki)

सुझुकी डिलरशिपवर तुम्ही ही गाडी बुक करू शकता. हायाबुसाचं नव्या मॉडेलमध्ये नवी कलर स्किमसह ड्युअल टोन कलर व्हेरियंट्स दिलं आहे. यात कँडी डेयरिंग रेडसह मॅटेलिक थंडर ग्रे, ग्लास स्पार्कल ब्लॅकसह मॅटेलिक ब्लॅक नंबर 2 आणि पर्ल ब्रिलियंट व्हाइटसह पर्ल विगोल ब्लू शेड आहे. (Photo: Suzuki)

2023 Suzuki Hayabusa मध्ये 1340 सीसी, इनलाइन फोर सिलिंडर, लिक्विड कूल इंजिन आहे. OBD2-A कॉम्प्लीयंट इंजिन नव्या एमिशन नियम डोळ्यासमोर ठेवून तयार केलं आहे. पॉवर स्ट्रान्समिशनसाठी 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स सुविधा आहे. (Photo: Suzuki)

हायाबुसामध्ये सिक्स एक्सिस आयएमयु, ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नरिंग एबीएस, तीन पॉवर मोड, क्रुझ कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. जापानी टू व्हीलर कंपनीने भारतात सुझुकीच्या थर्ड जनरेशन मॉडेल सादर केलं आहे. ही गाडी सुझुकीच्या गुरुग्राम प्लांटमध्ये असेंबल केली आहे. (Photo: Suzuki)