साक्षात परब्रम्हाला कोणता वैद्य बरा करणार? ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत मोठा ट्विस्ट

स्वामींचं आजारपण, कुलकर्णी वैद्यांना बोलवण्याचं प्रायोजन आणि स्वामी भक्त रावसाहेबांच्या घरची लगीनघाई या तिन्ही कथांचा विलक्षण चकित करणारा घटनाक्रम या आठवड्यात उलगडणार आहे. 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होते.

| Updated on: Apr 17, 2025 | 3:10 PM
1 / 6
'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत स्वामींची न भूतो न भविष्यति लीला सध्या उलगडत असून जिथे स्वामी अचानक खूप आजारी पडले आहेत. स्थानावर कमालीची अस्वस्थता आहे.

2 / 6
साक्षात परब्रम्हाला कोणता वैद्य बरा करणार कुणालाच काही कळत नाहीये. स्वामींवर कुठल्याच औषधाचा प्रभाव होत नाहीय. भक्तगण हतबल होतात.

3 / 6
ही स्वामींची लीला आहे हे बाळपाला जाणवतं आहे पण यावर उपाय काय हे मात्र त्याला कळत नाहीये. तो स्वामींना तशा अवस्थेत पाहू ही शकत नाहीय.

4 / 6
यातच बार्शीच्या कुलकर्णी वैद्य आणि त्यांची मुलगी उर्मिला यांची गोष्ट सुरू होते. उर्मिला दत्तभक्त आहे, पण घरची गरीबी आहे. तिला विचित्र स्वप्नं पडतात, ज्यात राजवाडा आणि राजा दिसतो. उर्मिला बेचैन होते, आणि दत्तगुरुंना उत्तरं मागते.

5 / 6
स्वामी उपचारांसाठी कुलकर्णी वैद्याला बोलवायला सांगतात. कपिला वैद्याला स्वामींच्या आजारपणाचा निदान करण्याकरता पैसे मागायला सांगते.

6 / 6
अक्कलकोटमध्ये स्वामी भक्त श्रीमंत रावसाहेबांच्या घरात अंबरीशसाठी स्थळ बघत आहेत. पत्नी अनुसूयाला मुलासाठी श्रीमंत मुलगी हवी आहे. अंबरीश दुसऱ्याच मुलाच्या नादी लागला आहे, पण घरचे तयार नाहीत. अनुसूया उत्तम स्थळ घेऊन येते, पण रावसाहेब स्वामींची परवानगी मागतात.