
अमेरिका संघामध्ये अनेक खेळाडू बाहेरून आलेले आहेत. काही खेळाडू आपल्या देशाच्या आंतरराष्ट्रीय संघासाठी खेळले आहेत. तर काही खेळाडूंना संधी मिळत नसल्याने त्यांनी अमेरिका संघाकडून आपलं क्रिकेट करियर करण्याचं ठरवलं आहे.

अमेरिका संघामध्ये एक असा खेळाडू आहे. ज्याने फक्त आपल्या प्रेमाखातर देश बदलण्याचा धाडसी निर्णय घेतला. इतकंच नाहीतर या खेळाडूने अमेरिका संघामध्ये आपली जागा मिळवली.

अमेरिका संघाकडून खेळण्याचा निर्णय त्याने घेतल्यावर त्याच्या देशातील क्रिकेटप्रेमींनी थट्टा करायला सुरूवात केली. मात्र आता उलटाच गेला आहे.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून कोरी अँडरसन आहे. अमेरिका संघ क्वालिफाय झाला आहे मात्र अँडरसन याचा न्यूझीलंड संघ वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे.

कोरी अँडरसन याने ३ सामन्यात १८ धावा केल्या आहेत. जर अँडरसन फॉर्ममध्ये आला तर अमेरिका संघ आणखी बळकट होणार आहे. याच अँडरसन याने २०१४ साली सर्वात कमी बॉलमध्ये वेगवान शतक करण्याचा विक्रम केला होता.