
कॅनडाचा संघ पहिल्यांदा T20 विश्वचषकात दिसणार आहे. कॅनडाने अमेरिका क्षेत्र पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात बर्म्युडाचा 39 धावांनी पराभव करून T20 विश्वचषक 2024 साठी पात्र ठरले.

अमेरिकेचा संघ यजमानपदी राहून T20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. अमेरिकन संघही पहिल्यांदाच T20 विश्वचषकात दिसणार आहे.

तिसरा संघ हा युगांडा असणार आहे. युगांडाचा संघ प्रथमच T20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. संघाने रवांडाचा 9 गडी राखून पराभव केला होता

अमेरिकेचा संघ १२ जूनला भारताविरुद्ध खेळणार आहे. 15 जून रोजी कॅनडाचा संघ भारतीय संघाशी भिडणार आहे. २०२४ च्या टी२० विश्वचषकासाठी कॅनडाचा कर्णधार साद बिन जफर आणि अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेल असणार आहे.