TMKOC: इतकी मोठी झाली ‘तारक मेहता’ फेम बाघाची मुलं; शोबिजपासून दूर राहते पत्नी, एकत्र दिसलं कुटुंब
TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत बाघाची भूमिका साकारत असलेला अभिनेता तन्मय वेकारियाची खऱ्या आयुष्यातील पत्नी आणि मुलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय आणि दीर्घकाळापासून सुरू असलेली मालिका आहे. या मालिकेला नुकतीच 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. या मालिकेत भूमिका साकारलेला प्रत्येक कलाकार घराघरात लोकप्रिय आहे. अभिनेता तन्मय वेकारिया या मालिकेत बाघाची भूमिका साकारत आहे. तन्मयने नुकतीच आलिशान गाडी खरेदी केली.

तन्मयने प्रीमिअम एसयूव्ही BMW X1 ही गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत जवळपास 65 लाख रुपये असल्याचं कळतंय. पांढऱ्या रंगाची ही नवीन आलिशान गाडी पाहून तन्मयचे कुटुंबीयसुद्धा खुश झाले. तन्मयनेही हा खास क्षण त्याच्या कुटुंबीयांसोबत मिळून साजरा केला.

तन्मय त्याची पत्नी आणि दोन मुलांसोबत ही गाडी खरेदी करायला गेला होता. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट झळकत होता. तन्मय आणि त्याच्या कुटुंबीयांनी नवीन गाडीसोबत फोटोसुद्धा काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला.

तन्मयच्या पत्नीने या नव्याकोऱ्या गाडीची पूजा केली. या गाडीच्या फोटोंपेक्षा चाहते तन्मयच्या कुटुंबीयांना फोटोमध्ये पाहून अधिक खुश झाले. 'बाघा'च्या भूमिकेतील तन्मय फार क्वचित त्याच्या कुटुंबीयांसोबत दिसतो. यावेळी त्याला पत्नी आणि मुलांसोबत पाहून चाहतेसुद्धा खुश झाले.

तन्मय वेकारियाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तन्मयच्या खऱ्या आयुष्यातील 'बावरी' म्हणजेच त्याच्या पत्नीचं नाव मितसू असून ती गृहिणी आहे. मितसू प्रकाशझोतापासून लांबच राहणं पसंत करते. तर तन्मयचा मुलगा हा अगदी त्याचीच कार्बन कॉपी वाटतो. त्याच्या मुलाचं नाव झीशान, तर मुलीचं नाव वृष्टी असं आहे.