
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारलेली अभिनेत्री झील मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. झीलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती त्याच्या बॉयफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करताना दिसून येत आहे.

झील मेहता ही गेल्या काही काळापासून आदित्य दुबेला डेट करतेय. काही महिन्यांपूर्वीच आदित्यने झीलला सरप्राइज देत प्रपोज केलं होतं. आता झीलने समुद्रकिनारी गुडघ्यावर बसून आदित्यला खास अंदाजात प्रपोज केलं आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

झीलने 2008 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारली होती. त्यानंतर शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने ही मालिका सोडली. झील तेव्हापासून अभिनयक्षेत्रापासून दूरच आहे. ती सध्या स्टुडंट हाऊसिंग नावाची कंपनी चालवते. तर झीलचा होणारा पती आदित्य हा गेमिंग इंडस्ट्रीत काम करतो.

झीलने शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालिकेचा निरोप घेतला होता. मात्र तिने साकारलेली सोनूची भूमिका आजही लोकप्रिय आहे. ‘ती आमची लहानपणीची क्रश आहे’, असंही अनेकांनी कमेंट्समध्ये म्हटलंय. सोशल मीडियावर झीलचा मोठा चाहतावर्ग आहे.

इन्स्टाग्रामवर झीलचे लाखो फॉलोअर्स आहेत. झील मेहताने 2008 ते 2012 पर्यंत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारली होती. त्यानंतर शिक्षणासाठी तिने मालिका सोडली. झील तिच्या आईसोबत ब्युटी बिझनेसमध्येही काम करते.