What India Thinks Today भारताला जागतिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टीकोनातून होणार चर्चा; या प्रसिद्ध व्यक्ती राहणार उपस्थित

प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 16, 2022 | 7:34 PM
1 / 7
 भारतातील अग्रगण्य व क्रमांक 1 ची वृत्तवाहिनी असलेल्या टीव्ही 9  न्यूज नेटवर्ककडून उद्या 17 व 18 जून रोजी ग्लोबल समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या समिटमध्ये राजकारण,प्रशासन,  अर्थशास्त्र,  आरोग्य, सांस्कृतिक  व क्रीडा या क्षेत्रातील प्रतिष्ठित व प्रभावी व्यक्ती आपली मते मांडणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी 17 जूनला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या  शिखर संमेलनाचे मुख्य भाषण करणार आहेत.

2 / 7

या कार्यक्रमात 75 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वक्ते सहभागी होणार आहेत. ग्लोबल थिंक फेस्ट जागतिक स्तरावर भारतात वाढत असलेल्या जागतिक दहशतवाद, तसेच विश्वगुरू होऊ पाहत असलेल्या भारताची प्रगती यासारख्या महत्त्वाच्या विषयावर आपली मते मांडणार आहेत.

3 / 7

या कार्यक्रमाचे आयोजन खरोखरच वेगळे आहे. कारण भारतातील 130 कोटी जनता ही गोष्ट जाणते की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वमुळे आज संपूर्ण जगात भारत आपला डंका वाजवत आहे.

4 / 7

या कार्यक्रमाचे आयोजन राजकारण व प्रशासन व्यापार व अर्थशास्त्र सामाजिक सांस्कृतिक व आरोग्य व्यवस्था तसेच खेळ व मनोरंजन यासारख्या चार महत्त्व महत्वपूर्ण विषयावर केंद्रित आहे.

5 / 7

हॉट इंडिया थिंग्स टुडे ग्लोबल समिटच्या उद्घाटन सत्रामध्ये 'महासत्तेच्या किती जवळ किती दूर' विषयावर असणार आहे. यावर पंधरा केंद्रीय कॅबिनेट मंत्री व देशाच्या विविध राज्यातून आलेले मुख्यमंत्री आपली मते व्यक्त करणार आहेत.

6 / 7

या ग्लोबल समिटमध्ये भारताने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही नवीन जागतिक व्यवस्थेचा भारताने अत्यंत यशस्वीपणे सामना केला व जगामध्ये आपल्या मजबूतपणे सहभाग नोंदवला.

7 / 7

या ग्लोबल समिट चा मुख्य उद्देश भारताला जागतिक महासत्त बनविण्यासाठी नवीन व क्रांतिकारी विचारांची निर्मिती करणे हाच आहे --

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us