AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांचा शिलेदार भाजपच्या समविचारी आघाडी जाणार? जोरदार शक्तिप्रदर्शन, घडामोडींना वेग

सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्तम जानकरांनी शक्तिप्रदर्शन केले. भाजपच्या समविचारी आघाडीत त्यांचा सहभाग होणार का? बिनविरोध निवडीबाबत त्यांनी नेमकी कोणती भूमिका मांडली? त्यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पवारांचा शिलेदार भाजपच्या समविचारी आघाडी जाणार? जोरदार शक्तिप्रदर्शन, घडामोडींना वेग
पवारांचा शिलेदार भाजपच्या समविचारी आघाडी जाणार? जोरदार शक्तिप्रदर्शन, घडामोडींना वेगImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 30, 2026 | 6:32 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या समविचारी आघाडीत सहभागी होण्याबाबत सूचक विधान केलं आहे. ‘आमचा विचार प्राधान्याने होणार आहे. माझे सर्व ठिकाणी मित्र आहेत. आम्हाला राखीव ठेवलं आणि जागा ओपन ठेवल्या तरी आम्ही जिल्हा बँकेत असू,’ असं जानकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तम जानकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उत्तम जानकर यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जानकर यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जात शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरले. माळशिरस तालुक्यातून त्यांच्या गटाच्या वतीने चार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ही निवडणूक आपण किंवा आपला मुलगा लढवत नसून कार्यकर्त्यांसाठी लढत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

बिनविरोध निवडीसाठी आमच्याशी संपर्क नाही

सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका उत्तम जानकर यांनी मांडली. मात्र, आपल्याला बाजूला ठेवून बिनविरोध निवडणूक होऊ शकत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘निवडणूक बिनविरोध व्हावी, पण आम्हाला सोडून होऊ नये. आम्हाला सोडून बिनविरोध केली तर निवडणूक लागेल,’ असा इशाराही त्यांनी दिला.

मोहिते-पाटील यांच्याकडून बिनविरोध निवडीसाठी आवाहन करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना, अद्याप आपल्याशी कोणीही संपर्क साधलेला नसल्याचं जानकर यांनी सांगितलं. बिनविरोध निवडीची प्रक्रिया 17 तारखेपर्यंत सुरू राहणार असून, या काळात अनेक प्रयत्न आणि वाटाघाटी होतील. प्रत्येक पक्षाच्या स्वतंत्र बैठका सुरू आहेत. सर्वांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न होत असून, आपल्यापर्यंतही संबंधित लोक येतील, असं त्यांनी नमूद केलं.

भाजपच्या समविचारी आघाडीत आमचा विचार होणार

भाजपच्या समविचारी आघाडीबाबत विचारण्यात आलं असता जानकर यांनी महत्त्वाचं विधान केलं. ‘यामध्ये आमचा विचार प्राधान्याने होणार आहे. माझे सर्व ठिकाणी मित्र आहेत. आम्हाला राखीव ठेवलं आणि जागा ओपन ठेवल्या तरी आम्ही जिल्हा बँकेत असू,’ असं ते म्हणाले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या समविचारी आघाडीसोबत जाण्याच्या शक्यतेची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्हा बँकेवर प्रदीर्घ काळ प्रशासक होता. या बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायांसाठीही सुलभ पद्धतीने कर्जवाटप व्हावं, अशी अपेक्षा जानकर यांनी व्यक्त केली.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान