AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Venus Rise : आज शुक्राचा उदय होताच ८ राशींचे अच्छे दिन सुरू; धन लाभासह मिळतील प्रगतीच्या संधी

Shukra Uday: आज ३० ऑक्टोबर रोजी शुक्राचा उदय होणार असून ज्योतिषशास्त्रानुसार याचा सकारात्मक प्रभाव आठ राशींवर पाहायला मिळेल. या राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि सुख-समृद्धीच्या संधी मिळतील. जाणून घ्या कोणत्या आहेत या ८ राशी.

Venus Rise : आज शुक्राचा उदय होताच ८ राशींचे अच्छे दिन सुरू; धन लाभासह मिळतील प्रगतीच्या संधी
| Edited By: | Updated on: Oct 30, 2026 | 6:35 PM
Share

वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती, वैभव, सुख-सुविधा आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह मानले जाते. सध्या शुक्र अस्त अवस्थेत असून 30 ऑक्टोबरला तो पुन्हा उदय होणार आहेत. पंचांगानुसार शुक्राचा उदय तुला राशीत होईल. ज्योतिषीय गणनेनुसार शुक्राच्या या स्थितीचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे काहींच्या उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होणे, अडकलेली कामे मार्गी लागणे, व्यवसायात विस्ताराच्या संधी मिळणे किंवा करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. या काळात नेमक्या कोणत्या 8 राशींना फायदा होण्याची शक्यता आहे, जाणून घेऊया.

मेष

उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी कामाचे कौतुक करतील. कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींचे सहकार्य मिळेल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल.

वृषभ

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने या राशीसाठी शुक्राचा उदय महत्त्वाचा ठरू शकतो. अडकलेली कामे पुन्हा वेग घेतील. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नात्यांमध्ये गोडवा वाढेल. सामाजिक मान-सन्मानात वाढ होईल. व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल जाणवेल.

मिथुन

कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. एखाद्या मोठ्या प्रोजेक्टची किंवा उच्च पदाची जबाबदारी मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. व्यवसाय विस्ताराच्या संधी मिळेल. क्रिएटिव्ह क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष यश मिळेल.

कन्या

नोकरीच्या नवीन संधी मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही काळ अनुकूल राहिल. नवीन कामाची सुरुवात होईल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत तयार होण्यामुळे आर्थिक अडचण कमी होईल. प्रेमसंबंधातील तणाव दूर होऊन जोडीदारासोबतचे संबंध अधिक चांगले होतील.

वृश्चिक

भौतिक सुख-सुविधांचा आनंद घेता येईल. एखादे स्वप्न किंवा ध्येय पूर्ण होऊ शकते. वाहन किंवा मालमत्ता खरेदीचा विचार असेल तर त्याला गती मिळेल. प्रेमसंबंधात सुख-शांती राहिल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळेल.

तूळ

शुक्राचा उदय तूळ राशीत होणार असल्याने या राशीच्या लोकांसाठी हा काळ महत्त्वाचा मानला जात आहे. आर्थिक अडचण दूर होईल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन डील किंवा करार करण्याची संधी मिळेल. गुंतवणुकीच्या चांगली संधी मिळेल. एखादी चांगली बातमीही मिळू शकते.

कुंभ

व्यक्तिमत्त्वात आकर्षण वाढण्याचे संकेत आहेत. एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न होईल. व्यापाऱ्यांना नफ्याच्या संधी मिळतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होण्यासोबतच जुन्या स्रोतांमधूनही आर्थिक लाभ होऊ शकतो.

मकर

करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. प्रमोशन किंवा नवीन उपलब्धी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम दिसतील. व्यवसायाची स्थिती सुधारू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबीय आणि जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान