
भारतीय संघाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ज्याने कमी कालावधीत भारताच्याच नव्हे तर परदेशातल्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय... ज्याच्या बॅटिंग इतकीच त्याच्या लाईफ स्टाईलबद्दलही चर्चा असते. परंतु शालेय वयात असताना त्याला गरिबीतून जावं लागलं. एकवेळ तर अशी आली की त्याला शाळेच्या फी चे पैसेही भरायला नव्हते. पण आज तोच हार्दिक पांड्या पोत्याने पैसा कमावतोय.

हार्दिक पांड्याने मुंबईत घर घेतलंय. त्या घरात तो त्याच्या संपूर्ण परिवारासोबत राहतो. पण शालेय वयात असताना फी चे पैसे भरायला नव्हते म्हणून त्याने नववीमधून शाळा सोडली. एका मुलाखतीत त्याने हा किस्सा सांगितला होता.

पांड्या गळ्यात नेहमी डायमंड लॉकेट असतं, त्याच्या हातात लाखोंची घड्याळं असतात, हजारोंची कपडे अंगावर असतात तर करोडोंच्या गाड्या तो वापरतो. यावरुन त्याची आर्थिक बाजू मजबूत असल्याचं दिसतं.

हार्दिक पांड्याचा जन्म 11 ऑक्टोबर 193 रोजी गुजरातच्या सुरत येथे राहणाऱ्या हिमांशू पंड्या यांच्या घरी झाला. हिमांशू पांड्या म्हणजेच हार्दिकचे वडील कार फायनान्सचा छोटा व्यवसाय करत असत.

त्यांनी मुलांना क्रिकेटपटू बनवण्यासाठी सर्व काही सोडले आणि ते वडोदराला आले. येथे संपूर्ण कुटुंबासमवेत एका छोट्याशा घरात ते राहू लागले. त्यावेळी हार्दिक आणि त्याचा भाऊ क्रुणाल यांना बर्याच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

हार्दिक खूप चांगलं इंग्लिश बोलतो. त्याच्या अस्खलित इंग्लिश बोलण्यानंतर अनेक जणांना वाटतं की तो फार शाळा शिकलाय. मात्र हार्दिक केवळ 8 वी पास असल्याचं खूप कमी लोकांना माहितीय. हार्दिकला इंग्लंड दौऱ्यात संधी मिळाली नाही. परंतु हार्दिक श्रीलंका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. तसंच त्याच्या खांद्यावर भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी देखील दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.