
इजिप्तमध्ये एका 13 वर्षीय मुलाने नाश्त्यामध्ये एक किंवा दोन नव्हे तर 3 पॅकेट्स कच्चे न्यूडल्स खाल्ले होते. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. न्यूडल्स खाल्ल्यानंतर काही वेळातच त्याला पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि तो अचानक उल्ट्या करू लागला.

कुटुंबीयांनी मुलाला ताबडतोब रुग्णालयात दाखलं केलं. परंतु डॉक्टर त्याचे प्राण वाचवू शकले नाहीत. जर तुम्हालाही कच्चे न्यूडल्स खाण्याची सवय असेल तर सावध व्हा. कारण तुमच्या आरोग्यासाठी हे अत्यंत घातक ठरू शकतं.

जर तुम्ही कच्चे न्यूडल्स अधिक प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेत अडथळा निर्माण होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, इन्स्टंट न्यूडल्समध्ये सोडियमचं प्रमाण खूप जास्त असतं. WHO नुसार, तुम्ही एका दिवसात फक्त 2000mg पर्यंत सोडियम खाऊ शकता. ही रोजची मर्यादा आहे.

इन्स्टंट न्यूडल्यच्या एका पॅकेटमध्ये `1829 मिलीग्रॅम सोडियम असतं. शरीरात अधिक प्रमाणात सोडियम गेल्यास रक्तदाब अचानक वाढू शकतो आणि त्याचा परिणाम हृदयावरही होऊ शकतो.

कच्चे न्यूडल्स पचायला जड असतात. त्यामुळे मधुमेह आणि कर्करोगाचाही धोका वाढतो. कच्च्या न्यूडल्यमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाणही कमी होऊन डिहाड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. म्हणूनच सहसा इन्स्टंट न्यूडल्स खाऊ नये आणि खाल्ले तर ते कायम शिजवूनच खावेत, असा सल्ला डॉक्टर देतात.