Raqesh Bapat and Tejashree Pradhan: राकेश बापटसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर तेजश्री प्रधानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

Raqesh Bapat and Tejashree Pradhan: गेल्या काही दिवसांपासून तेजश्री प्रधान ही बिग बॉस अभिनेता राकेश बापटशी लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता यावर थेट तेजश्री प्रधानने प्रतिक्रिया दिली आहे. ती काय म्हणाली जाणून घ्या...

| Updated on: May 16, 2026 | 7:23 PM
1 / 5
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून तेजश्री प्रधान आणि बिग बॉस मराठीमधील अभिनेता राकेश बापट लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता यावर तेजश्री प्रधानने प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

2 / 5
राकेश बापटची बहिण शितलने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये शितल यांनी "मी काही दिवसांपूर्वी राकेशला एक बातमी दाखवली होती. एक रील सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. त्या व्हिडीओमध्ये राकेश बापट आणि तेजश्री प्रधान मे महिन्यात लग्न करणार असल्याचं सांगितलं जात होतं. तेव्हा राकेश बिग बॉसच्या घरात होता" असे म्हटले होते.

3 / 5
पुढे शितलने, माझ्या मैत्रिणी मला व्हिडीओ पाठवत होत्या आणि विचारत होत्या, अगं आता ही कोणती सून? पण प्रत्यक्षात त्या दोघांचा काहीच संबंध नाही. लोक उगाचच चर्चा रंगवत होते. त्या व्हिडीओमध्ये तर त्यांच्या लग्नाची तारीखसुद्धा सांगितली होती. पण असं काहीच घडलं नव्हतं. हा व्हिडीओ फेक असल्याचे शितलने सांगितले होते. त्यानंतर आता याबाबत चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

4 / 5
तेजश्री प्रधानने या सर्व प्रकरणावर आता प्रतिक्रिया दिली आहे. तिने कमेंट करत अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि खोट्या बातम्या न पसरवण्याचे आवाहन केले आहे..

5 / 5
राकेश बापटने देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. त्याने "मी तेव्हा बिग बॉसच्या घरात होतो. बाहेर हे सगळं सुरू आहे याची मला कल्पनाच नव्हती. बाहेर आल्यानंतर बातमी पाहिली तेव्हा मलाच धक्का बसला. मध्येच हे काय सुरू झालं असा प्रश्न मला पडला. शोमध्ये असल्यामुळे मला काहीच माहिती नव्हतं" असे म्हटले.

Follow Us