
खरतर आज अभिषेक असता तर निवडणुकीची मजा वेगळी असती. अभिषेक सगळं हँडल करायचा. पहिल्यांदा असं होतय अभिषेक नाहीय आणि निवडणुकीला मी उभी आहे. त्याची खूप आठवण येतेय. पण त्याची साथ आहे मला माहित आहे असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.

कुटुंब आणि राजकारण हे वेगळं आहे. कुटुंबियांचा आशीर्वाद असणारच आहे. राजकारणात त्यांचे विचार वेगळे आणि माझे वेगळे, असं भाजपकडून निवडणूक लढवण्यावर तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.

सासूबाईचा आशिर्वाद घेताना त्या भावुक झालेल्या. यावर तेजस्वी म्हणाल्या की, "त्या माझ्या आई आहेत. त्या जसं अभिषेकला मिस करतायत तसं मी ही मिस करतेय. अभिषेक नाहीय त्याची कमी जाणवतेय"

माझा विजय निश्चित आहे असं मला वाटतं. मी आणि अभिषेकने केलेलं काम त्यामुळे विजयाचा विश्वास वाटतो. लोक विकासासाठी मतदान करतील असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.

अभिषेक घोसाळकरांचा फोटो वापरु नका असं शिवसेना नेते सांगत होते, अभिषेक घोसाळकर माझे पती होते, त्यांचा फोटो वापरायचा की नाही हे सांगायचा कोणालाही हक्क नाही. मला त्यावर कमेंट करायची नाही.