AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Election 2026 Voting : आज दारू मिळेल की नाही? बँका सुरू राहिल का? आज काय काय राहणार सुरू? संपूर्ण यादी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी आज मतदान सुरु झाले आहे. १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी असल्याने कार्यालये, बँका, शाळा बंद राहतील, पण अत्यावश्यक सेवा व वाहतूक सुरु असेल. १६ जानेवारीला निकाल जाहीर होतील. मुंबई महापालिकेसह या निवडणुकांना मोठे महत्त्व असून मतदारांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

Maharashtra Election 2026 Voting :  आज दारू मिळेल की नाही? बँका सुरू राहिल का? आज काय काय राहणार सुरू? संपूर्ण यादी एका क्लिकवर
महापालिकांसाठी मतदानाला सुरूवात, आज काय राहणार बंद ?
manasi mande
manasi mande | Updated on: Jan 15, 2026 | 10:27 AM
Share

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या संग्रामाला आज सुरूवात झाली असून सकाळी 7.30 पासूनच मतदान केंद्रांवर मतदानाचं कर्तव्य बजावण्यासाठी नागरिकांना रांगा लावल्या आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील एकूण 29 महापालिकांसाठी मतदान होत असून सर्वत्र मोठा उत्साह दिसत आहे. अनेक ठिकाणी सकाळी थंडी असूनही नागरिक मोठ्या उत्साहाने घराबाहेर पडून मतदान केंद्रांवर जाऊन आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी उभे आहेत. आज संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदान करता येणार असून उद्या म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. राज्याताली महापालिकांवर कोण विजयी पताका फडकावतो हे उद्याच स्पष्ट होईल.

दरम्यान आजच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर , महाराष्ट्र सरकारने आज ज्या ठिकाणी नगरपालिका निवडणुका होत आहेत त्या सर्व ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या या आदेशात मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबईसह 29 महानगरपालिका समाविष्ट आहेत. मतदान सुरळीत पार पडावे आणि मतदारांचा सहभाग वाढून पर्यायी मतदानाचा टक्का वाढावा हा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे आज कपठे काय बंद असेल आणि कोत्या सुविधा सुरू असतील असा प्रश्न अनेक नागरिकांच्या मनात आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

काय राहणार बंद ?

– कार्यालये आणि संस्था बंद

– सरकारी आणि निमसरकारी कार्यालये

– महामंडळे आणि मंडळे

– सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम

– बँका

– बीएमसीच्या अधिकारक्षेत्रात स्थित केंद्र सरकारची कार्यालये

– अनेक खाजगी कार्यालये देखील बंद राहू शकतात ( हे त्यांच्या वैयक्तिक संघटनात्मक धोरणांवर अवलंबून असेल.)

– सरकारी आणि महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.

– मुंबई येथे मुख्यालय असलेले BSE आणि NSE 15 जानेवारी रोजी म्हणजेच आज संपूर्ण सुट्टी पाळतील. इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज आणि कमोडिटीजमध्ये (सकाळच्या सत्रात) कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

अत्यावश्यक सेवा आणि वाहतूक

– रुग्णालये, रुग्णवाहिका, पोलिस आणि अग्निशमन विभाग पूर्णपणे कार्यरत असतील.

– लोकल ट्रेन आणि बेस्ट बस नेहमीप्रमाणे धावतील, ज्यामुळे मतदारांना कोणत्याही अडचणीशिवाय त्यांच्या मतदान केंद्रांवर पोहोचता येईल.

दारू बंदी

– सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी प्रशासनाने 13 ते 16 जानेवारी असे चार दिवस ‘ड्राय डे’ जाहीर केले आहेत.

– त्यामुळे राज्यात या 29 महानगरपालिका क्षेत्रात दारू विक्री आणि सेवनावर पूर्ण बंदी असेल.

– या काळात दारूची दुकाने, बार आणि परमिट रूम बंद राहतील.

मतदारांसाठी विशेष व्यवस्था

– ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांसह एकल पालकांसाठी प्राधान्य मतदान व्यवस्था.

– सर्व बूथवर पिण्याचे पाणी, वीज, शौचालये आणि रॅम्प यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध असतील.

2017 नंतर बीएमसी निवडणुका

महाराष्ट्रातील 9 महानगरपालिकांमध्ये आज सकाळी 7.30 वाजता मतदान सुरू झालं. 29 महानगरपालिकांमधील 2 हजार 869 जागांसाठी 15 हजार 931 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राज्यातील 3 कोटी 49 लाख मतदार त्यांचे भवितव्य ठरवतील.

तसेच बीएमसीच्या निवडणुकांसाठीही 2017 नंतर आज मतदान होत आहे. यावेळीच्या बीएमसी निवडणुका खूपच रंजक आहेत, कारण फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना ( शिदे गट- ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट – शरद पवार गट) बीएमसी निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आले असून निवडणूक लढवत आहेत. बीएमसी निवडणुकीत मराठी अस्मिता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकांकडे लागलं आहे.

मतदारानं सांगितलं एक मत द्यायला 5 वेळा बटण दाबलं... पुण्यात EVM चा घोळ
मतदारानं सांगितलं एक मत द्यायला 5 वेळा बटण दाबलं... पुण्यात EVM चा घोळ.
गणेश नाईक यांचं मतदार यादीत नावच नाही, नाव गायब होताच संतापले
गणेश नाईक यांचं मतदार यादीत नावच नाही, नाव गायब होताच संतापले.
कोणतीही सबब नको आणि.. प्राजक्ता माळी हिची मतदारांना कळकळीची विनंती
कोणतीही सबब नको आणि.. प्राजक्ता माळी हिची मतदारांना कळकळीची विनंती.
मतदान सुरू होताच EVM पडले बंद, पुण्यात मतदान केंद्रावर चाललंय काय?
मतदान सुरू होताच EVM पडले बंद, पुण्यात मतदान केंद्रावर चाललंय काय?.
500-500 रूपयांच्या नोटाच नोटा, पैशांची बॅग सापडली, खारघरमध्ये गदारोळ
500-500 रूपयांच्या नोटाच नोटा, पैशांची बॅग सापडली, खारघरमध्ये गदारोळ.
मुंबईत ठाकरे बंधुंच्या युतीची परीक्षा, 29 महापालिकांसाठी आज मतदान
मुंबईत ठाकरे बंधुंच्या युतीची परीक्षा, 29 महापालिकांसाठी आज मतदान.
महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम: उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद
महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम: उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद.
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 केंद्रांवर मतदान
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 केंद्रांवर मतदान.
सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?
सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?.
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम.