AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: या पाडूची काहीतरी गडबड… मुंबईतच ही मशीन का? संजय राऊतांना तो मोठा संशय…

Sanjay Raut on BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिटच्या (PADU) वापरावरून संशयाचं धुकं काही कमी झालेलं नाही. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडूवर मोठे वक्तव्य केल्यानंतर आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी मोठा संशय व्यक्त केला आहे. काय आहे ती गडबड?

Sanjay Raut: या पाडूची काहीतरी गडबड... मुंबईतच ही मशीन का? संजय राऊतांना तो मोठा संशय...
संजय राऊत, पाडू मशीनImage Credit source: टीव्ही ९ मराठी
KALYAN DESHMUKH
KALYAN DESHMUKH | Updated on: Jan 15, 2026 | 10:16 AM
Share

Sanjay Raut on BMC Election 2026 PADU : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सकाळीच उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेचा गड कोण सर करणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. तर उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचंही या निवडणूक लक्ष लागलेलं असू शकतं. आजच्या पत्रकार परिषदेत राऊतांनी भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादीमधील राड्यावर भाष्य केले. तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिटच्या (PADU) वापरावर संशय व्यक्त केला. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडू यंत्र आताच का आणलं यावरून राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर आज संजय राऊत यांनी मोठा संशय व्यक्त केला.

या PADU ची काही गडबड

140 पाडू युनिट मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. पण आपत्कालीन परिस्थितीतच या पाडू मशीनचा वापर करण्यात येणार असल्याचे काल मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले. दरम्यान आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी या पाडू मशीनवर मोठा आक्षेप नोंदवला. पाडू लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत का आणले नाही, असा सवाल राऊतांनी केला. आता अचानक हे मशीन केवळ मुंबई महापालिकेसाठीच का आणण्यात आले, असा प्रश्न त्यांनी केला. आम्ही कधी या मशीनचे नावही ऐकले नाही. पण मुंबई महापालिका निवडणुकीतच आयोगाला या मशीनची आठवण कशी झाली, असा खोचक सवाल त्यांनी केला.

पाडू हे मशीन केवळ मुंबई महापालिकेतच का वापरण्यात येत आहे? हे मशीन ठाणे, पुणे, अमरावती, नागपूर आणि इतर महापालिकांमध्ये का वापरण्यात येत नाही? संपूर्ण महाराष्ट्रातच 29 महानगरपालिकांमध्ये निवडणूक होत आहे, मग आपत्कालीन स्थिती मुंबईतच का होणार? ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, नांदेड, चंद्रपूर इथं अशी आपत्कालीन परिस्थिती नाही का निर्माण होणार? असा सवाल करत हे पाडू काहीतरी गडबड असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला. लोकांच्या मनात या पाडू विषयी संशय आहे. पाडू येऊद्या की ताडू, आम्ही अधिक सर्तक आणि सावध असल्याचा दावा राऊतांनी केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोग ही भाजपची एक शाखा असल्याचा आरोप केला.

हरामाचा पैसा वाटण्यात येतोय

लोकशाहीत मतदान ही पहिली लढाई आहे. मतदान प्रक्रियेत गडबडी रोखण्यासाठी भगवा स्कॉड तयार असल्याचे ते म्हणाले. जिथे असे प्रकार होतील. तिथे हा भगवा स्कॉड अशा लोकांना ठोकून काढणार आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या हा स्कॉड कार्यरत असल्याचा दावा त्यांनी केला. तर जे राडे करतायेत त्यांचे मी अभिनंदन करतो असा टोलाही राऊतांनी लगावला. हरामाचा पैसा वाटला जातो, हे भाजप नेते गणेश नाईक सांगतायेत. पैसा लुटला जात आहे. शिंदे आणि भाजपमध्ये हा वाद सुरू आहे. सरकारमध्ये अनागोंदी, अराजक माजलेली आहे. सत्ता आणि पैशासाठी हे पक्ष एकत्र आले आहे. मराठी माणसांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

मतदारानं सांगितलं एक मत द्यायला 5 वेळा बटण दाबलं... पुण्यात EVM चा घोळ
मतदारानं सांगितलं एक मत द्यायला 5 वेळा बटण दाबलं... पुण्यात EVM चा घोळ.
गणेश नाईक यांचं मतदार यादीत नावच नाही, नाव गायब होताच संतापले
गणेश नाईक यांचं मतदार यादीत नावच नाही, नाव गायब होताच संतापले.
कोणतीही सबब नको आणि.. प्राजक्ता माळी हिची मतदारांना कळकळीची विनंती
कोणतीही सबब नको आणि.. प्राजक्ता माळी हिची मतदारांना कळकळीची विनंती.
मतदान सुरू होताच EVM पडले बंद, पुण्यात मतदान केंद्रावर चाललंय काय?
मतदान सुरू होताच EVM पडले बंद, पुण्यात मतदान केंद्रावर चाललंय काय?.
500-500 रूपयांच्या नोटाच नोटा, पैशांची बॅग सापडली, खारघरमध्ये गदारोळ
500-500 रूपयांच्या नोटाच नोटा, पैशांची बॅग सापडली, खारघरमध्ये गदारोळ.
मुंबईत ठाकरे बंधुंच्या युतीची परीक्षा, 29 महापालिकांसाठी आज मतदान
मुंबईत ठाकरे बंधुंच्या युतीची परीक्षा, 29 महापालिकांसाठी आज मतदान.
महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम: उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद
महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम: उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद.
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 केंद्रांवर मतदान
छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 केंद्रांवर मतदान.
सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?
सिंचन योजनेत 110 कोटींचा घोटाळा, पवारांच्या आरोपांवर काय म्हणाले खडसे?.
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम
येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सवाची धूम.