
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि तेजस्विनी पंडितची आई ज्योती चांदेकर पंडित यांचं शनिवारी 16 ऑगस्ट रोजी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार अंत्यविधीला उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही ज्योती चांदेकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते.

ज्योती चांदेकर यांच्या पश्चात अभिनेत्री तेजस्विनी पंडितसह दोन मुली आहेत. तेजस्विनीनेच ज्योती यांना मुखाग्नी दिला.

आईला अखेरचा निरोप देताना तेजस्विनीला अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे किंवा विविध मुलाखतींमध्ये तेजस्विनी तिच्या आईविषयी अनेकदा मोकळेपणे व्यक्त व्हायची.

ज्योती चांदेकर यांनी अनेक मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘मी सिंधूताई सपकाळ’, ‘पाऊलवाट’, ‘सुखान्त’, ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’, ‘सलाम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय.