
हजारो भारतीय पर्यटक दरवर्षी थायलंड आणि कंबोडिया या देशांना भेट देतात. या दोन्ही देशांमधील खाद्यपदार्थ लोकप्रिय आहेत. आज आपण या दोन्ही देशांमधील चपातीची माहिती जाणून घेऊयात.

थायलंड आणि कंबोडियामध्ये चपाती वेगवेगळ्या प्रकारची असते. साधी चपाती, अंडा चपाती असे काही प्रकार आहेत. येथे चपाती भाजली जात नाही, तर तळून बनवली जाते. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या चपातीच्या किमतीही वेगवेगळ्या आहेत.

थायलंडमध्ये एका साध्या चपातीची किंमत 32 रुपये आहे. साध्या रोटीव्यतिरिक्त, येथे अंडा चपातीही प्रसिद्ध आहे. भारतीय चलनात याची किंमत 65 ते 70 रुपये आहे.

थायलंडमध्ये केळीची चपातीही लोकप्रिय आहे. केळीच्या चपातीची किंमत 90 रुपये आहे. ही किंमत वेगवेगळ्या शहरात वेगवेगळी असू शकते. मात्र साधी चपाती सर्वत्र सर्वात स्वस्त मिळते.

कंबोडियामध्ये एका चपातीची किंमत 1000 कंबोडियन रियल आहे, जी भारतीय रुपयांमध्ये 22 रुपयांना मिळते. मात्र कंबोडियामघ्ये थायलंडप्रमाणे वेगवेगळ्या चपात्या मिळत नाहीत. दरम्यान या दोन्ही देशांमधील जेवण भारतीयांना आवडते.