थंडीच्या दिवसांमध्ये मुंबईजवळ फिरण्यासाठी सर्वात सुंदर ठिकाणं, एकदा भेट द्याल तर पुन्हा-पुन्हा जाल
जर तुम्ही देखील थंडीच्या दिवसांमध्ये लांब न जाता मुंबईजवळच फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ठाण्याच्या जवळ असणारी ही तीन ठिकाणं ठरू शकतात फायदेशीर. एकदा भेट दिली तर पुन्हा-पुन्हा जाण्याची होईल इच्छा.

हिवाळा सुरु होताच अनेकजण बाहेर थंड हवेच्या ठिकाणी फिरण्याचे प्लॅन आखायला सुरुवात करतात. पावसाळा संपल्यानंतर वातावरण आल्हाददायक होते आणि त्यामुळे कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासह छोट्या ट्रिपसाठी लोक घराबाहेर पडतात.
जर तुम्ही मुंबई किंवा मुंबईच्या आसपास राहत असाल आणि विकेंडला एखादी छोटी ट्रिप करण्याचा विचार करत असाल, तर ठाण्यातील काही सुंदर ठिकाणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.
निसर्गाच्या सानिध्यात काही निवांत क्षण घालवायचे असतील तर येऊर हिल स्टेशन हा चांगला पर्याय आहे. ठाण्याच्या परिसरातील हे हिरवाईने नटलेले ठिकाण मुंबईपासूनही सहज पोहोचता येण्यासारखे आहे.
ठाण्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक म्हणजे उपवन तलाव. येऊर टेकड्यांच्या पायथ्याशी असलेला हा तलाव आपल्या शांत आणि सुंदर वातावरणासाठी ओळखला जातो. कुटुंबीयांसोबत किंवा मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.
ठाण्यातील गायमुख चौपाटी हेदेखील फिरण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. घोडबंदर रोडच्या परिसरातील या ठिकाणी वॉटरफ्रंटसोबतच हिरवाईचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.