
उन्हाळा जवळ आल्याने सूर्य आग ओकताना आपण सर्वांच जर अनुभवत आहोत. हवामान खात्याकडून अनेक ठिकाणीचे तापमान अजून तापण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असे असतानाच राजस्थानातील काही कुटुंब भंडारा जिल्ह्यात आले आहेत.

उंट हे वाळवंटातील जहाज म्हणून ओळखले जातात. सध्या भंडारा जिल्हातील ग्रामीण भागात रस्त्यांवर हे वाळवंटातील जहाज व मेंढी फिरताना आढळून येतात. उंट व मेंढी पाळणाऱ्या या कुटुंबीयांना दरवर्षी रोजगाराच्या शोधात भटकंती करावी लागते.

रोजगाराच्या शोधात सध्या काही कुटुंबे ग्रामीण भागातील परिसरात दाखल झाले आहेत. मूळ राजस्थानातील असलेले हे कुटुंब जिल्ह्यात पाण्याचा शोधात दरवर्षी हजारो मैल गाठत उन्हाळ्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात येत असतात.

उंटाच्या काही सवयी विचित्र असतात. तो कुत्र्याप्रमाणे चावा घेतो. उंट दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारात त्यांच्या पाठीवरचे कुबड किंवा उंचवटा म्हणजे मदार एकच असते तर काही उंटामध्ये दोन मदारी असतात. अरेबियन उंट हे पूर्ण पाळीव प्राणी असून त्याच्या पाठीवर एकाच मदार असते. गोबीचे वाळवंट तसेच लदाखच्या नुब्रा व्हॅलीमध्ये दोन मदारी असलेले उंट आढळतात.

सर्वात उंच प्राणी उंटाचे वय सुमारे 40 ते 50 वर्षांपर्यंतचे असते. जेव्हा उंट एखादी गोष्ट खातो तेव्हा काही वेळाने ती गोष्ट ते रवंथ करत असतो. तो २० दिवास पाणी न पिता राहू शकतो. मात्र दीर्घ प्रवासाला जाताना किंवा त्याला पाणी पाजले कि एकावेळी तो १०० लिटर पेक्षा जास्त पाणी पितो. विशेष म्हणजे उंटाला एकदा रस्ता समजला कि मालक नसतानाही तो न चुकता मार्गक्रमणा करू शकतो.उंटीणीचे दुध अतिशय पौष्टिक असते. उंटाच्या शरीरातील पाणी २५ टक्के कमी झाले तरी त्याला त्याचा त्रास होत नाही.