
दिवाळी म्हणजे दिव्यांचा प्रकाशमय सण. यासाठी दरवर्षी दिवे लावून आपण हा सण साजरा करतो.

दिवाळीला लहानग्यांसह मोठ्यांचंही मुख्य आकर्षण ठरतं ते म्हणजे आकाश कंदील.

दिवाळी आता अवघ्या काहीच दिवसांवर आली आहे. अशात आता आकाश कंदीलांनी बाजारपेठा तेजोमय झाल्या आहेत.

वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आले आहेत.

हे आकाश कंदील खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दीसुद्धा पाहायला मिळत आहे.

फक्त खरेदीसाठीच नाही तर, या आकर्षक आकाश कंदीलांना पाहून नागरिकांना फोटो आणि सेल्फी काढण्याचा मोहसुद्धा आवरत नाहीये.

कोरोनामुळे अनेक व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र बाजारपेठांमधील गर्दी पाहता जवळजवळ सहा महिन्यांनंतर व्यापाऱ्यांवर चांगले दिवस आले असल्याचं दृष्य आहे.

आकाश कंदीलांसह अन्य पूजेच्या वस्तूसुद्धा बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या आहेत.

विविध प्रकारच्या कलाकृती बाजारपेठांमध्ये बघायला मिळत आहेत.