
एकीकडे जागतिक बाजारपेठेत अमेरिकच्या टॅरिफच्या निर्णयाने खळबळ माजली असताना जळगावच्या सराफ बाजारात सोन्या - चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली असून दराने उच्चांकी गाठली आहे

गेले काही दिवस सोन्याच्या दरात मोठी चढ-उतार होत आहेत.जळगावात गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 1500 रुपयांनी वाढ झाली आहे.

सोन्या चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या चढउतरामुळे ग्राहक नेमकी खरेदी करावी की मोड करावी या संभ्रमात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जळगाव सराफाबाजारात सोन्याचे एका तोळ्याचे ( 10 ग्रॅम ) दर GST सह 95 हजार 900 रुपये तर ( एक किलोग्रॅम ) चांदीचे दर 99 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

जळगावातील सराफ बाजारातील सोन्याचे आजचे ( शनिवार ) दर 95 हजार 900 हे जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासातले विक्रमी दर आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात सलग तीन दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 4 हजार 400 रुपयांची वाढ झाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सोन्याचे दर 96 हजारांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले असून चांदीचे दर पुन्हा एका लाखांच्या उंबरठ्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहक आणि गुंतवणुकदारात कन्फ्युजन आहे.