
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि रेखा यांची लव्ह स्टोरी सर्वांनाच माहिती आहे. अमिताभ बच्चन यांचे अगोदरच लग्न झाल्यामुळे रेखा आणि त्यांची लव्ह स्टोरी पुढे जाऊ शकली नाही. मात्र, एका गोष्टीनंतर अमिताभ बच्चन यांनी थेट रेखाच्या कानाखाली दिली होती.

ज्यावेळी रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा रंगली होती, त्यावेळी जया बच्चन या खूप नाराज झाल्याचे सांगितले जाते. मात्र, रेखा यांना जया बच्चनमुळे नाही तर एका दुसऱ्याच कारणामुळे अमिताभ बच्चन यांनी मारले होते.

लावारिस चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यावेळी एका ईरानी डांन्सरसोबत अमिताभ बच्चन यांची जवळीकता खूप वाढली होती. त्याची तूफान चर्चा रंगताना दिसली. याबद्दल बोलण्याचा प्रयत्न रेखा यांनी अमिताभ बच्चन याच्यासोबत केला.

हे सर्व रेखा अमिताभ बच्चन यांना बोलत असताना वाद सुरू झाला आणि थेट अमिताभ बच्चन यांनी रेखा यांच्या कानाखालीच मारली. हा सर्व प्रकार चित्रपटाच्या सेटवरच घडला.

अमिताभ बच्चन यांनी कानाखाली मारल्यानंतर अनेक दिवस रेखा या नाराज असल्याचेही सांगितले जाते. अमिताभ बच्चन यांनी रेखासोबत असलेल्या नात्यावर कधी भाष्य केले नाहीये. मात्र, रेखाने अमिताभ बच्चनसोबत असलेल्या नात्यावर अनेकदा भाष्य केले आहे.