
कॉफी विथ करण सीजन 8 मध्ये करण जोहर हा मोठे खुलासे करताना दिसतोय. करण जोहर याने नुकताच त्याच्या आणि काजोलमध्ये झालेल्या वादावर भाष्य केले. इतकेच नाही तर एका वादानंतर करण आणि काजोल हे दोन वर्षे एकमेकांना बोलले नव्हते.

करण जोहर म्हणाला की, माझा आणि काजोलचा वाद हा अजय देवगण याच्या 'शिवाय' आणि 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटांच्या होणाऱ्या टक्करमुळे झाला. आम्ही दोन वर्षे एकमेकांना अजिबात बोललो नाही. आमच्यात भांडणे झाली.

पुढे करण जोहर म्हणाला, मला ज्यावेळी मुले झाली आणि त्यावेळी मी काजोल हिला फोटो पाठवला. त्यानंतर माझ्यामधील आणि काजोलमधील वाद मिटला.

करण जोहर आणि काजोल हे खूप जास्त चांगले मित्र आहे. अनेकदा हे पार्टींमध्ये धमाल करताना दिसतात. करण जोहर हा त्याच्या शोमधून मोठे खुलासे करताना दिसत आहे.

करण जोहर याच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच सारा अली खान ही दाखल झाली. यावेळी सारा हिच्यासोबत चंकी पांडे याची लेक अनन्या पांडे देखील उपस्थित होती.