पॅनिक अटॅकची समस्या सतावतेय, धोका कमी करण्यासाठी या 5 सोप्या सवयी ठरतील महत्त्वाच्या

छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि हातपाय थरथर कापणे याला पॅनिक अटॅक म्हणतात... आजच्या धावपळीच्या विश्वात अनेकांनी ही समस्या जाणवते... तर यावर मात करण्यासाठी 5 सोप्या सवयी तुम्हाला महत्त्वाच्या ठरतील...

| Updated on: Aug 26, 2026 | 4:40 PM
1 / 5
नियमित झोप घेतल्याने  फायदा होईल. दररोज पुरेशी आणि नियमित झोप घेतल्याने शरीर आणि मनाला विश्रांती मिळते. झोपेच्या कमतरतेमुळे तणाव आणि चिंता वाढू शकते.

नियमित झोप घेतल्याने फायदा होईल. दररोज पुरेशी आणि नियमित झोप घेतल्याने शरीर आणि मनाला विश्रांती मिळते. झोपेच्या कमतरतेमुळे तणाव आणि चिंता वाढू शकते.

2 / 5

नियमित व्यायाम करा. चालणे, योगा किंवा हलका व्यायाम यांसारख्या नियमित गोष्टींमुळे तणाव कमी होण्यास आणि मनःस्थिती सुधारण्यास मदत होते.

3 / 5

चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक्स आणि इतर कॅफीनयुक्त पेयांमुळे काही लोकांमध्ये हृदयाची गती वाढू शकते किंवा अस्वस्थता येऊ शकते. त्यामुळे त्यांचे सेवन मर्यादित करणे उचित आहे.

4 / 5

चिंता कमी करण्यासाठी मद्य किंवा इतर अमली पदार्थांचे सेवन करणे योग्य नाही. यामुळे दीर्घकाळात चिंता आणि पॅनिकची लक्षणे अधिकच बिघडू शकतात.

5 / 5

जर तुम्हाला वारंवार पॅनिक अटॅक, हृदयाची धडधड, चक्कर येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर योग्य वैद्यकीय तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या, कोणतीही गोष्ट डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा...

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us