AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान सीमेवर मोठं काही होणार? सीमेलगतच्या 20 गावांमध्ये 10 IPS अधिकारी मुक्कामी, ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची काय स्टॅटर्जी?

Operation Sindoor India Pakistan: पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी हल्ला झाला, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 7 मे 2025 रोजी लष्करी अभियान राबवले. तेव्हापासून दोन्ही देशात अनेक स्तरावरील बोलणी थांबली आहे. आता सीमावर्ती भागातून एक मोठी अपडेट समोर येत आहे.

पाकिस्तान सीमेवर मोठं काही होणार? सीमेलगतच्या 20 गावांमध्ये 10 IPS अधिकारी मुक्कामी, ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची काय स्टॅटर्जी?
पाकिस्तान सीमेवर मोठं काही होणार? 20 गावांमध्ये 10 IPS अधिकारी मुक्कामी
| Updated on: Nov 25, 2026 | 7:35 AM
Share

Operation Sindoor India Pakistan: भारत आणि पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर्ती भागात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. गुजरात पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी एक खास मोहीम राबवली जात आहे. आगामी 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी गुजरात राज्यातील सीमावर्ती भागातील 20 गावांमध्ये 10 वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी दोन दिवस मुक्कामी असतील. या दोन दिवसांत अधिकारी गावकऱ्यांशी केवळ चर्चाच करणार नाहीत, तर या भागातील रस्त्यांचे जाळे, पळवाटा, भौगोलिक परिस्थिती, सामाजिक समीकरण, पाकिस्तानपासूनचे अंतर, दळणवळणाची साधनं आणि इतर अनेक बाबींवर मंथन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या भागात भारत मूलभूत सोयी-सुविधाच उभारणार नाही तर आणखी काही तर करण्याची योजना आखत असल्याची चर्चा सुरक्षा तज्ज्ञांमध्ये आहे.

22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर बेछुट गोळीबार करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 7 मे 2025 रोजी लष्करी अभियान राबवले. तेव्हापासून दोन्ही देशातील द्विपक्षीय वार्ता, व्यापार, राजकीय वार्ता बंद झाल्या आहेत. काल परवा एका कार्यक्रमानिमित्त पाकिस्तानचे अधिकारी दिल्लीसह उत्तर भारतात दाखल झाले असले तरी अधिकृत संवादाला अद्याप सुरूवात झालेली नाही.

या जिल्ह्यात 10 IPS अधिकारी मुक्कामी

मिळालेल्या माहितीनुसार, या दोन दिवसात वरिष्ठ 10 आयपीएस अधिकारी हे कच्छ, वाव-थराद आणि पाटण जिल्ह्यांतील सीमावर्ती गावांमध्ये मुक्कामी असतील. स्थानिक नागरिकांच्या घरीच त्यांचा मुक्काम असणार आहे. या काळात या भागातील ग्रामस्थांच्या अडीअडचणीच समजून घेण्यात येणार नाही तर भौगोलिक परिस्थिती, दळणवळणाची साधनं, विकास योजना, पायाभूत सुविधांसोबत मोठी स्ट्रॅटर्जी आखण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सनदी अधिकारी याभागातील पोलीस अधिकारी, पोलीस यंत्रणा, सुरक्षा यंत्रणांची सज्जता, गस्त व्यवस्था आणि विद्यमान सुरक्षा रचनेची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. पोलिसांना कोणत्या बाबींची कमतरता भासते. त्यांना कोणती आयुधं लागणार आहेत. त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, संख्याबळ यासह इतर बाबींवर चर्चा होणार आहे.

फोर-टियर सिक्युरिटी ग्रिडची चर्चा

देशाच्या सीमा अधिक बळकट करणे आणि तिथे कडक सुरक्षा व्यवस्था बसवणे यासाठी फोर टियर सिक्युरिटी ग्रिडची संकल्पना समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यावर विशेष लक्ष दिले आहे. अहमदाबाद येथे त्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक झाली. सीमावर्ती भागात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कुंपण आणि सर्वकष क्षेत्रीय सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यावर या योजनेत भर देण्यात येणार आहे.

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी